मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन! #First State Level Women's Literary Conference at Mool!




स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड!

मुल (लक्ष्मण खोब्रागडे)    
 साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री प्रा. रत्नमालाताई भोयर , माजी नगराध्यक्ष नगर परिषद मूल तथा महिला अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. रत्नमाला भोयर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य असून त्यांची साहित्यिक म्हणून तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेली आहेत . त्यांना विविध संस्थांमार्फत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
              पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमाला भोयर यांची निवड झाल्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सचिव लक्ष्मण खोब्रागडे , मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , शशिकलाताई गावतुरे , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ  देऊन अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments