उमेदवार व मतदारांना 'बुचकाळ्या'त टाकणारी निवडणुक ! Candidates and voters put the election in the dark!




चंद्रपूर (वि.प्रति.)

आजपासुन १२ दिवसांनी म्हणजे १९ एप्रिल ला महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याची निवडणुक होत आहे , पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभेच्या १५ पैकी एका उमेदवाराला मतदारांनी निवडून द्यायचे आहे. आजपासून उमेदवारांला प्रचारासाठी अवघे १० दिवस राहिले आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात दुहेरी लढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
----------------------------------------------------
Also read...

वातावरण निर्मितीत कांग्रेसची आघाडी! : मोठ्या प्रमाणात लागलेले बैनर, पोस्टर, गावा-गावात फिरणारे भोंगे यातुन वातावरण निर्मिती करण्यात कांग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर या आघाडीवर आहेत. महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक रमेश चेनिधल्ला, सरचिटणीस मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते, आम. विजय वडेट्टीवार यांची प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना एकसंघ आणण्याचा झालेला प्रयत्न, काॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा चंद्रपूर दौरा काय किमया दाखवेल याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदर प्रचारात वातावरण निर्मीतीत कांग्रेस उमेदवाराने मुसंडी मारली आहे परंतु असंतुष्ट-नाराज कार्यकर्त्यांचे समाधान करण्यात मोठ्या नेत्यांना मात्र यश आले नाही. मागील वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीत अग्रस्थानी असलेले या निवडणुकीत दिसत नाही, अशी विचारणा कांग्रेसचे पदाधिकारी करू लागले आहेत. नियोजनाचा अभाव, असंतुष्टांना "तनाने" आलेल्यांना आपल्या खेम्यात "मनाने" आणण्यात कांग्रेस अपयशी ठरतांना दिसत आहे.

सुक्ष्म नियोजन व पदाधिकाऱ्यांवर पकड भाजप ची जमेची बाजु ! : सभा, बैठका, आॅनलाईन बैठका, लोकप्रतिनिधी म्हणून केलेले कार्य, समस्या जाणुन त्यांचे समाधान करण्यावर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा जास्त जोर असून ते स्वतः रात्रौ उशिरापर्यंत जागे राहून या सर्व बाबींकडे लक्ष देत आहे. प्रत्येक "बुथ" वर बुथ कमेट्यांनी लक्ष देण्यावर त्यांचा भर आहे. मतदारांची संपूर्ण यादी त्यांच्या नजरेखालून गेली असून यासारख्या सुक्ष्म नियोजनावर भाजप उमेदवार मुनगंटीवार यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. एवढ्या व्यस्तस्तेत ही आलेल्या प्रत्येकांचे त्यांच्या स्वभावाप्रमाणे फोन उचलुन त्याचे समाधान व्हावे, यासाठी ते आजही तेवढेच आग्रही आहेत, ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. भाजप असंतुष्ट अजुन मुनगंटीवार यांच्या प्रचारात उतरले नाहीत म्हणून चर्चांना आलेला ऊत व उमेदवार मुनगंटीवार  यांचा विशिष्ट भागाव्यतिरिक्त त्यांचा प्रत्यक्ष नसलेला संपर्क ही त्यांची डावी व कमजोर बाजु आहे. नुकतेचं भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजुरा येथे झालेल्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या सभेमुळे वाढतो की टिकून राहतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------------------------
Also read...


--------------------------------------------------

राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांची जुळवा-जुळव, नाराज असलेल्यांची मनधरणी, पक्षांतर, पक्षांतर्गत कलह, फोडाफोडी करण्याचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन आरोप-प्रत्यारोप, टिका-टिप्पणी करून "दिशाभुल " करीत मतदारांना बुचकाळ्यात टाकण्याचा दुसऱ्या  टप्प्याला आता सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील मागील पाच वर्षात झालेल्या राजकीय घडामोडी, उलथापालथ, पक्षफोडी, राजकीय नेत्यांनी ध्येय धोरणांना वाहिलेली तिलांजली बघता कार्यकर्ते, पदाधिकारी यांची एकंदर  मन:स्थिती बदलली आहे. गल्ली-गल्लीत 'राजकीय चाणक्य' तयार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणुक उमेदवाराला 'बुचकाळ्या'त टाकणारी अवश्य आहे.

'राजकीय बेरोजगार' झालेल्यांना भविष्याची चिंता ! : "राजकीय बेरोजगार" झालेल्यांना भविष्याची चिंता दुर करणारी ही निवडणूक असल्याचे चित्र चंद्रपूर मध्ये दिसत आहे. लोकसभा निवडणुक असली तरी पुढे येणारी विधानसभा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत च्या निवडणुका मागील दोन वर्षापासुन राजकीय अस्थिरतेमुळे रडखडल्या आहेत. त्यामुळे "राजकीय बेरोजगार" झालेल्यांचा मतदारांसोबतचा तुटलेला संपर्क या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांसमोर जुळण्याची आयती चालुन आलेली नामी संधी या नजरेतून सुद्धा या निवडणुकांकडे बघितल्या जात आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वाढलेल्या  "अपेक्षा" यातुन मुंबई, जि.प., न‌.प. मध्ये जाण्याचे दिवास्वप्न यानिमित्ताने संभाव्य उमेदवारांना पडू लागले आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा याकडे नजर फिरवून स्वार्थाकडे-स्वहिताची अपेक्षा वाढल्यामुळे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यातील निरूत्साह या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. म्हणूनचं उमेदवारांसाठी ही निवडणूक "बुचकळ्यात" टाकणारी आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही व यांची कल्पना नेत्यांना-उमेदवारांनाही आलेली असेलचं.

उमेदवारांची परीक्षा आणि कार्यकर्त्यांचे धर्मसंकट !: या शेल्यापासून त्या शेल्यापर्यंत असलेले निर्वाचन क्षेत्रात इतक्या अल्पावधीत उमेदवार पोहोचू शकत नाही. उमेदवाराची पूर्ण दारोमदार ही त्यांच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांवर निर्भर आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही "परिक्षा" पास होण्यासाठी कोणत्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास टाकायचा ही "सत्वपरीक्षा" आहे तर कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्याचं उमेदवारांचे "काम" करायचे की "राजकीय बेरोजगारी" दुर करणाऱ्या पक्षाचा प्रचार करायचा या धर्मसंकटात पडलेला आहे, त्यामुळे  मतदार मात्र संभ्रमात आहे. सकाळी "कमळ" फुलवायचा  व सायंकाळी हातात "हात" टाकुन आपला गळा ओला करायचा, हा मधातील पर्याय  निवडून "बेरोजगारी" मोकळी होतांना दिसत आहे.  "आमचे" निघाले "चमचे" निवडणूक निकालानंतर पराजित उमेदवारांकडून  ऐकायला मिळेल, हे‌निश्चित! 

आशयात मोठ्या अश्या छोट्या-छोट्या चावडीवरील महत्वाच्या चर्चा....!
चावडीवर, पानटपरीवर चालणाऱ्या चर्चांकडे विशेषतः दुर्लक्ष केल्या जाते मात्र या चर्चांमधून मोठ्या प्रमाणात वास्तव समोर येते. दुखावलेला, असंतुष्टी दुर करण्यासाठी  मद्य ठोकसलेला याचं चावडीवर बिनधास्तपणे आपले दु:ख हक्काने कथन करतो, या चर्चांचा आढावा घेतला तरी निवडणुकीसंदर्भातील कुणाची हवा-वातावरण व कुणाची "टर्र" होणार यांचे वास्तव समोर येते.
एका न्युज चैनेलने  चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या नुकत्याच घेतलेल्या सर्व्हे मध्ये ग्रामीण भागातील  बहुतांश लोकांना निवडणुक कशाची व उमेदवार कोण याची कल्पनाचं नाही आणि विशेष म्हणजे  सगळ्यात जास्त मतदान ग्रामीण भागातचं आहे.

प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी-घटक पक्षांचे पदाधिकारी मतदारांपर्यंत पोहोचले नाही  काय? असा विचार केला असता ज्यांचेकडे पक्ष प्रचाराची जबाबदारी आहे, त्यांना योग्य "सन्मान" दिला नसल्याचे कारण पुढे येत आहे. त्यांचे उत्तर ही चावडीवरचं मिळते ज्यांचेकडे "सन्मान" आला आहे तोच नेता "मान" खाली टाकून फक्त "सन" दाखवित आहे व आपलाचं उमेदवार सगळ्यात जास्त मताधिक्याने कसा निवडून येणार याचे नेत्यांच्या "तोऱ्यात" विश्लेषण करीत फिरत आहे, ही बाब उमेदवाराला "बुचकळ्यात" टाकणारी आहे.
ज्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या प्रचाराची धुरा देण्यात आली आहे तेच पदाधिकारी -कार्यकर्ते आज प्रामाणिकपणे कार्य करतांना दिसत नाही. उमेदवारांच्या पराभवाच्या हे मोठे व प्रमुख कारण ठरू शकते, यासाठी "सावध" पवित्रा उमेदवार घेतील, असे सुचवावेसे वाटते!

"इतकी टोपी उसके सर...!"
सोशल माध्यमातून पुढारी झालेले "झोला-छाप" पुढारी आज निवडणुकीनिमित्ताने मार्केटमध्ये फिरतांना दिसत आहे. "इसकी टोपी उसके सर!" अश्या नेत्यांची फार चलती आहे, सकाळचा नाश्ता व जेवण एकाकडे सायंकाळचे मद्य व जेवण दुसरीकडे! अश्या "खोट्या शीक्क्यां"ची निवडणुकीपर्यंतची  झालेली व्यवस्था घातक आहे.  नेत्यांसोबत फोटो काढून आपणचं "पॉवर" असल्याचा आव "कुत्रं ही विचारात नाही" असे झोला-छाप पुढारी  आज दाखवित आहे, याला "हात" नेत्यांनीच दाखवायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या