असा सन्मान हे सुधीरभाऊचे भाग्य !
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे सुधीर मुनगंटीवार यांचे नावाचे महाविद्यालय !

मुनगंटीवार यांच्या कार्यकतृत्वाची फलश्रुती!

चंद्रपूर : चंद्रपूर पासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आणि आठवे ज्योर्तिंलिंग म्हणून प्रसिद्ध असलेले औंढा नागनाथ या गावातील एका महाविद्यालयाला चक्क सुधीर मुनगंटीवार यांचे नाव देण्यात आले आहे. या महाविद्यालयात पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मग जिल्ह्यापासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेला मुनगंटीवार यांचेच नाव कां असा प्रश्न सहाजिकच उद्भवतो. सुधीरभाऊंनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या गावाला विकासासाठी शासकीय निधीतून विकास निधी दिला होता. त्या विकास निधीतून औंढा या गावांमध्ये पहिली ते बारावी पर्यंत ज्ञानदानासाठी एक महाविद्यालय बनविण्यात आले, त्या महाविद्यालयात आज ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असून औंढा नागनाथ गाववासियांनी चक्क या महाविद्यालयाला सुधीर मुनगंटीवार महाविद्यालय असे नाव देऊन मुनगंटीवार यांचे मानलेले आभार हे संतांनी सांगितलेल्या वाणीप्रमाणे आहे, "कुकर्म करणारी, नितीमत्ता सोडलेली माणसं वरपाणी कितीही ऐशोआरामात जगतांना दिसली तरी ही तुम्ही आपली विचारधारा बदलु नका. जे पेरालं तेच उगवणार, त्यामुळे आपल्या कर्माशी प्रामाणिक रहा. कारण कर्म जेंव्हा वसुलीवर येते तेंव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. जे पेराल तेचं उगवेल." मुनगंटीवारांनी शासकीय विकासासाठी दिलेल्या निधीतून ज्ञानादानासाठी बनविलेल्या महाविद्यालयाचे नांव सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय असे नांव देऊन मानलेले आभार ही फार मोठी पावती आहे.

हे पण उल्लेखनीय !
गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ भाऊंनीच आणले. नागपूर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे सार्थ नामकरण त्यांच्याच प्रयत्नामुळे झाले. उल्लेखनिय बाब अशी कि श्री गुरूदेव भक्तांनी गुरुकुंज मोझरी येथील ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू आणि ईतर अन्य राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली. त्या पीठावर सुधीर मुनगंटीवार यांना बसवून सन्मानित केले. अंधजनांच्यासाठी केलेले महत्वपूर्ण कार्य यामुळे पुणे भागात झालेला त्यांचा सत्कार, विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या तीन घटना सुधीर यांचा सर्वात मोठा सन्मान आहे. आता चौदा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय हे नाव घेऊन गावकऱ्यांनी सुधीर भाऊ च्या खऱ्या अर्थाने कार्यकर्तृत्वाचा सत्कार सन्मान केला आहे.

थोडक्यात काही.... !
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसांना न्याय मिळवून देणे, विधानसभेतील देवदुर्लभ कामगिरी, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय (महाराष्ट्र-गुजरात-गोवा) प्रदेश भाजपाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक समितीच्या कार्यकारिणीचे राष्ट्रीय सदस्य, महाराष्ट्र-गुजरात सह त्या समितीचे प्रभारी, खेचून आणलेल्या विकास योजना, त्यांनी विधीमंडळात मांडलेले प्रश्न, जनदेवतेचे श्रावण बनणे सारेच्या सारे अद्भूतच आहे. त्यांचा जीवनपट द्यायचा नाही पण जे काही लिहीले त्यापासून नविन पिढीने बोध घ्यावा आणि सुधीर मुनगंटीवारांनी देशाच्या राजकारणात ध्रुवतारा बनावे या माफक अपेक्षासाठी हा लिखाण प्रपंच !

Post a Comment

0 Comments