राजुरा पोलिसांनी चार दिवसापूर्वी पकडले सुगंधित तंबाखू चे वाहन, अद्याप गुन्हा दाखल नाही?



अन्न प्रशासन विभागाचा सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांना संरक्षण?

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू च्या व्यापार मोठ्या जोरा-शोराने सुरू आहे. आरोग्यास हानिकारक असलेल्या सुगंधित तंबाखू व्यापारावर कारवाई करण्याचे विशेष अधिकार राज्यातील पोलिसांना देण्यात आले आहे. परंतु ही कारवाई केल्यानंतर त्याच्या सूचना अन्न प्रशासन विभागाला देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभाग हा कुंभकर्णी झोपेमध्ये असून सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांना त्यांची पाठराखण असल्याचे बोलले जाते.

सुगंधित तंबाखू च्या मुख्य व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळा!
पालकमंत्री नाम. वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले निर्देश !


आज शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी "मंथन" सभागृहात या पोलीस सभागृहात जिल्ह्यातील अपराधाविषयी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुगंधित तंबाखू च्या व्यापारात शामिल असलेल्या मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळा! असे निर्देश दिलेत. जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून पोलिस विभागाने सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या आहेत. परंतु अद्यापही या कारभारातील मोठे मासे बाहेर आहेत.

राजुरा पोलिसांनी चार दिवसापूर्वी पकडले सुगंधित तंबाखू चे वाहन, अद्याप गुन्हा दाखल नाही?
मंगळवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी राजुरा पोलिसांनी सुगंधी तंबाखू चे वाहन पकडले. राजुरा पोलिसांच्या म्हणण्यानुसार यासंबंधात जिल्हा अन्न प्रशासन विभागाला तशा सूचनाही देण्यात आल्या परंतु आज चार दिवस लोटूनही अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी सदर सुगंधी तंबाखू विषयी कोणतीही तक्रार राजुरा पोलिसांना दिली नसल्यामुळे अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभागात सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांना संरक्षण देत असल्याचे बोलल्या जाते.

मोजके 6-7 मुख्य व्यापारी जिल्ह्यात सक्रीय, लाखोंच्या बिदागी तून करोडोंचा व्यापार !

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये सुगंधित व तंबाखूचा व्यापार करणारे मोजके सहा-सात व्यापारी आहेत. जयसुख-मनसुख-जितेंद्र-नुतन व आत्ता आत्ता पोलिसांनी मुसक्या आवळल्या वसीम नव्याने च्या धंद्यात प्रवेश केलेला गणेश गुप्ता यांचे या धंद्यावर वर्चस्व आहे. गणेश गुप्ता याच्यावर यापूर्वी चंद्रपूर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती नुकतेच 26 रोजी गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलिसांनी गणेश गुप्ता यांचे सुगंधित तंबाखू ची वाहन पकडले होते. गुप्ता मात्र यातून निसटण्यात यशस्वी झाला. राजुरा पोलिसांनी सव्वीस तारखेला पकडलेली सुगंधित तंबाखू चे वाहन गुप्ता याचेच असल्याची माहिती आहे. पोलिसांनी वाहन पकडल्यानंतर चार दिवसानंतर अद्यापपावेतो अन्न व प्रशासन विभागाने राजुरा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याची साधी औपचारिकता पूर्ण केले नाही यावरूनच अन्न प्रशासन विभागाचा झोल व त्यांचे सुगंधित व्यापाऱ्यांशी असलेले मधुर संबंध याचा अंदाज लावता येतो.

सुगंधित तंबाखू वर कारवाई करण्याचे पोलिस विभागाला विशेष अधिकार !

‘सार्वजनिक हित पाहणे ही शासनाची जबाबदारी असून पानातील सुगंधित तंबाखू आणि सुपारी मानवी आरोग्यास घातक असल्याने त्यावर राज्य सरकारने लागू केलेली बंदी ही कायमच राहणार आहे,’ असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले.
पानातील १२०/३००, तसेच रिमझिम प्रकारचा सुगंधित तंबाखू आणि सुपारीच्या विक्रीस राज्य सरकारने बंदी घातली असून‌ ‘जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांवर बंदी घालण्याची तरतूद अन्नसुरक्षितता कायद्यात आहे. गुटखा, पानमसाल्यासह पानातील सुगंधित तंबाखू, सुपारी यांच्यावर घातलेली बंदी कायम असून महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) ने राज्य पोलिस विभागाला सुगंधित तंबाखू खरेदी आणि विक्री मध्ये शामिल असणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, पोलीस विभागाला यासंदर्भात विशेष अधिकार प्रदान करण्यात आले असून त्या संदर्भात 5 जुलै 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक बोलावून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

Post a Comment

0 Comments