सुधीर भाऊ च्या रुपाने पुन्हा एकदा झाले माणुसकीचे दर्शन !चंद्रपूर : आज एसटी महामंडळाने त्यांच्या संपूर्ण मागण्या पुर्ण न झाल्यामुळे एकाएकी संप पुकारला. आज सकाळला बसेस सुरु असतांना जिल्ह्यातील काही विद्यार्थी बसने शिक्षणासाठी व शैक्षणिक कामासाठी चंद्रपुरात एसटीने आलेत. शैक्षणिक कामे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस चंद्रपूर शहराच्या बाहेरील हे विद्यार्थी एसटी स्टँडवर गेले त्यावेळेस त्यांना बसचे वाहक व चालक यांनी संप पुकारल्याचे कळले. आता आपापल्या घरी जाण्याची पंचायत झाली म्हणून मस्तकावर हात देऊन काही विद्यार्थी बसले असतानाच त्यातीलच एका विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी वित्तमंत्री व सध्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना फोन लावला की आमच्या जाण्याची व्यवस्था नाही. एस. टी. महामंडळाने एकाएकी संप पुकारला आहे, आम्ही काय करायचे? आणि अपेक्षेप्रमाणे व सुधीरभाऊंच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी फोन उचलला. विद्यार्थ्यांची अडचण ऐकली व लगेच मनपा स्थाई समितीचे अध्यक्ष संदीप आवारी व उपमहापौर राहुल पावडे यांना फोन करून लगेच त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. पन्नास च्या जवळपास असलेल्या या विद्यार्थ्यांची सोशल माध्यमांच्या  पत्रकारांनी मुलाखत घेतली, या मुलाखतीत सुधीरभाऊंचे व त्यांच्या टीमचे या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. एकाएकी पुकारलेला संप व त्यामुळे होणारी अव्यवस्था याचा अनुभव आज शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आला. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून अनोळखी असलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही वेळ न दवडता सुधीर भाऊंनी वेळेवर केलेलं सहकार्य हे सुद्धा विद्यार्थ्यांनी अनुभवले. सुधीर भाऊ व त्यांची टीम यांचे आभार पन्नास च्या जवळपास असलेल्या या विद्यार्थ्यांची सोशल च्या पत्रकारांनी मुलाखत घेतली, या मुलाखतीत सुधीरभाऊंचे व त्यांच्या टीमचे या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे अनेक चर्चे, किस्से ऐकायला आणि वाचायला मिळतात विद्यार्थ्यांना आज आलेला अनुभव हा सुधीर भाऊ च्या प्रचलित स्वभावाची ओळख करून देणारा व त्यांच्या माणूसकीचे दर्शन घडविणारा आहे.
अनोळखी माणसांचे फोन उचलने, काही कारणास्तव तो फोन न उचलता आल्यास त्यांना फोन करणे, त्यांचेशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या विचारणे, व त्या समस्यांचे समाधान करणे, समोरच्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देणे, समाधान करणे, हा सुधीर भाऊंना मिळालेला दैवी गुण आहे, भाऊंना प्राप्त झालेल्या या दैवी गुणांचा प्रत्यय आज संकटात सापडलेल्या या विद्यार्थ्यांना ही आला, लोकप्रतिनिधी कसा असावा, यांचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. आत्ता दिपावलीच्या वेळी जाहिराती मागतील किंवा जुन्या जाहिरातींचे बिल मागतील या संभ्रमाने अनेक नेत्यांनी, त्यांच्या छुटभैय्यांनी (त्यात भाजप ही समाविष्ट आहे.) परिचित पत्रकारांचे फोन उचलणे ही बंद केल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. सुधिरभाऊंकडून त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दोन-चार चांगल्या गोष्टी अवश्य अधिग्रहण कराव्या, हेच या निमीत्ताने सांगावेसे वाटते.
.

Post a Comment

0 Comments