अखेर चंद्रपूरच्या गणेश गुप्ता वर 22 लाखांच्या सुगंधित तंबाखू सहीत डुग्गीपार पोलिसांची कारवाई!




!! विदर्भ आठवडी चे वृत्त निघाले सत्य !!
चंद्रपूर (वि.प्रति.) मंगळवार दिनांक 26/10/2021 रोजी गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीसांनी मोठी कारवाई सुगंधी तंबाकु, ट्रक सहीत 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल जप्त केला. यामध्ये नागपूरचा शाहरुख नासिर खान (27) व चंद्रपूरचा गणेश गुप्ता याला मुद्देमालासहीत कारवाई केली असून ही  कारवाई गोंदिया चे पोलिस अधिक्षक  विश्व पानसरे, सहा. पोलीस अधिक्षक गोंदिया अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली आहे.

गणेश गुप्ता फरार?

साप्ताहिक विदर्भ आठवडी न्यूज पोर्टल ने दोन आठवड्यांपूर्वी चंद्रपूरातील गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू च्या व्यापारात प्रवेश केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते, गोंदिया पोलिसांनी चंद्रपूरच्या गणेश गुप्ता वर डुग्गीपार येथे मुद्देमालासह केलेली कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सद्यपरिस्थिती गणेश गुप्ता फरार असून बंदी असलेला सुगंधित तंबाखू गणेश गुप्ता याच्याच असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात गणेश गुप्ता फरार असल्याची माहिती मिळाली आहे.


सविस्तर वृत्त असे की, रायपुर वरुन नवेगावबांध कडे निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधी तंबाकुची वाहतुक होत असल्याची माहीती दि. 26/10/2021 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन वांगडे यांना मुखबीर कडुन मिळाली त्या माहीतीच्या आधारे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदारा सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौक नाकाबंदी करुन सदर ट्रकची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र.एम.एच. 40 बि.जी - 3444 त्यामध्ये 1) 27 बॉक्स ज्यामध्ये सुगंधीत तंबाकु (मजा 108) चे 500 ग्रमचे 538 बॉक्स किं. 10,25,670/- 2) 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाकु (ईगल) चे 400 ग्रॅमचे 400 पॅकेट एकुण कि. 2,16000/- रुपये व ट्रक अंदाजे कि.10,00000/- असा एकुण किंमती 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत सुगन्धित तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी 1) शाहरुख नासिर खान वय 27 वर्षे रा. नागपुर 2) गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांचे विरुदध अप. क्र. 280 /2021 कलम 188, 272, 273, 328 भादवी सहकलम 3,26 (2)(i), 26 (2) (iv) ,27 (2) (e) ,30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदर कारवाई मा.श्री विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया , मा.श्री अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.

Post a Comment

0 Comments