जिल्ह्यात सुगंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात यावे !रासपची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचेकडे मागणी

जिल्ह्यात अवैध दारु विक्री करणारे ते पन्नास हजार दारू विक्रेते आता काय करताय?

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील अपराधाचे प्रमाण वाढले आहे, याविषयी एक समिती नेमण्यात यावी यासंदर्भात आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत लोकलेखा समितीचे अध्यक्ष व पूर्व वित्तमंत्री मुनगंटीवार यांची मुंबई येथे बैठक झाली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 50 हजार पेक्षा जास्त आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलिसांनी अधिकृतरित्या सांगीतले आहे. आज ज्यांच्यावर दारूविक्री चे दोन पेक्षा जास्त गुन्हे आहे ते दारू बंदी उठल्यानंतर काय करीत आहे यावर पोलिस विभागाचे लक्ष आहे कां? हा विषय महत्त्वाचा आहे.
जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर काही चुकीच्या व्यवसायाला जिल्ह्यात अधिकृत परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे. आता ही अधिकृत परवानगी कोण देते? हा शोधाचा आणि संशोधनाचा विषय आहे. दारू बंदी उठल्यानंतर जिल्ह्यात संपूर्ण राज्यामध्ये बंदी असलेला सुगंधित तंबाखू यामध्ये प्रवेश करणारे तत्व याचाही शोध व्हायला हवा. सट्टा व्यवसायात परमिशन घेऊन आज कार्यरत असणारे कोण?
पैशाच्या हव्यासापोटी गैरमार्गाने याठिकाणी सक्रीय असणारे हे जिल्ह्यासाठी घातक आहेत, याच विषयाला अनूसरून रासपने नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे सुगंधित तंबाखू चा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस विभागाला प्रदान करण्यात यावे, यासंबंधीचे निवेदन दिले आहे. जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखू च्या व्यापार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून गैर प्रवृत्तीच्या लोकांनी या व्यवसायात प्रवेश केला आहे, दारूबंदी उठल्यानंतर सुगंधित तंबाखू चा व्यापार करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढली असून संपूर्ण राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा व्यापार फक्त जिल्ह्यापूरता मर्यादित नसून गोंदिया व छत्तीसगडमध्ये नेट वर्क वाढविण्यात जिल्ह्यातील या सुगंधीत तंबाखू च्या व्यापाऱ्यांनी मजल मारली आहे. जिल्ह्यात लाखोची बिदागी देऊन करोडोचा व्यापार सुरू आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पोलिसांनी यावर धडक कारवाई करत वसीम झिंगरी या एका प्याद्याला अटक केली. परंतु त्याच्या मागे असणारे व अन्य व्यापारी अद्यापही मोकळे आहेत त्याचे काय त्याचाही तपास व्हायला हवा.

दारूबंदी नंतर जिल्ह्यातील अवैध दारूविक्री मध्ये समाविष्ट असणाऱ्या गुन्हेगारांवर दोष सिद्ध व्हावे, यासाठी पोलीस विभागाने पुरावे जमा करण्यात कोणतीही कसर सोडू नये. जिल्ह्यातील दारूबंदी नंतर पन्नास हजाराच्या वर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु अद्यापपावेतो कोणालाही यामध्ये शिक्षा झाली नाही. शिक्षा झाली नसल्यामुळे अपराधी मानसिकतेच्या गैर प्रवृत्तींची मानसिकता बळावली असून जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या अपराधी प्रवृत्ती मध्ये वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


जिल्‍हयातील गुन्‍हयांसंदर्भात दोषसिध्‍दीचे प्रमाण वाढवावे–आ. सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर जिल्‍हयात खुन, दरोडे, बलात्‍कार, खंडणी असे गुन्‍हेगारीचे प्रकार मोठया प्रमाणावर वाढले आहे. जिल्‍हयात मा‍फीयाराज निर्माण झाले
असून गॅंगवारच्‍या दिशेने जिल्‍हयाची वाटचाल सुरू आहे. गुन्‍हयांसंदर्भात दोषसिध्‍दी वाढवावी आणि गुन्‍हेगारीच्‍या वाढत्‍या घटनांवर आळा
घालण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दिनांक २६ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील गुन्‍हेगारीच्‍या घटनांवर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याबाबत आढावा बैठक मंत्रालय मुंबई येथे बोलाविली. या बैठकीला अपर मुख्‍य सचिव गृह श्री. मनुकुमार श्रीवास्‍तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजयकुमार गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्‍सेना, महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव महेश वरूडकर, जहांगीर खान आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्‍हयातील वाढत्‍या गुन्‍हेगारीच्‍या घटनांवर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाहीची हमी पोलिस महासंचालकांनी यावेळी दिली. येत्‍या एक ते दोन महिन्‍यात या संदर्भातील फरक आपल्‍याला निश्‍चीतपणे जाणवेल असेही पोलिस महासंचालक म्‍हणाले. जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी परस्‍परांमध्‍ये समन्‍वय ठेवून प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करावी असे निर्देश अपर मुख्‍य सचिव गृह यांनी यावेळी दिले.
जिल्‍हयात मोठया प्रमाणाव महिलांवर अत्‍याचार होत असून अशा घटनांमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. बालीकांवर अत्‍याचार होत आहेत. अशा प्रकरणांमध्‍ये गुन्‍हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. या प्रकरणांमध्‍ये गांभीर्याने लक्ष देण्‍याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

Post a Comment

0 Comments