Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

वसिमच्या अटकेनंतर, "गुप्ता"चा कारोबार जोरात !  • "नुतन" यानेचं "वसिमचा" म्होरक्या बदलविण्यासाठी गेम केल्याची तंबाखू व्यावसायिकांमध्ये चर्चा !
  • वसीम वर कारवाई नंतर ही तंबाखुचा जोमाने व्यवसाय सुरू !

चंद्रपूर (वि.प्र.) : संपूर्ण राज्यामध्ये बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा व्यापार जिल्ह्यामध्ये जोरात सुरू आहे. काही दिवसापूर्वी चंद्रपूरच्या एल.सी.बी. पथकाने वसीम झिंगरी नावाच्या एका व्यापाऱ्याला यामध्ये अटक केली होती. अद्याप त्याची जमानत झाली नसल्याचे कळते. मागील काही वर्षापासून वसीम तंबाखूच्या व्यवसायात सक्रिय होता. "बोलणे उद्धट, कायदा आपल्या बापाच्या" या प्रवृत्तीच्या वसिमचा नुकताच गेम वाजला. "म्होरक्या" बदलण्यासाठी नूतन नावाच्या सुगंधित तंबाखू व्यापारात सक्रीय असलेल्या एकाने आता "वसिम" नको "गुप्ता" हवा, या तत्वावर "वसिम"चा गेम करण्यात आल्याचे वसीम चे सुगंधित व्यापारी मित्र सांगत आहे. काही दिवसात करोडोची माया जमा करणारा वसीम आता जमानत मिळावी यासाठी तडफडत आहे. वसिम जेलमध्ये असतानाही हा कारोबार जसाचा तसा सूरू होता. मग या बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूच्या व्यापारामध्ये पडद्यामागची भूमिका कोण बजावीत आहे? याचा तपास पोलिसांनी अवश्य करायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार वसीमच्या अटकेनंतर या व्यवसायातील जुने-जाणते स्मगलर असलेले तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. "नूतन" ने "गुप्ता" या म्होरक्याला वाढविण्यासाठी "वसीम" चा गेम केला याची सूरू असलेली चर्चा वसिम च्या अटकेनंतर ही जिल्ह्यात पूर्ववत सुरू असलेला सुगंधित तंबाखू चा व्यवसाय हा याचा पूरावा आहे.

"मी नाही त्यातली, कडी लावा आतली!"
जिल्हा अन्न-प्रशासन विभागाची भुमिका !


चंद्रपूर जिल्हा अन्न प्रशासन विभागाची भूमिका राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या व्यवसायात नेहमीच संशयित राहिली आहे. "आमचेपाशी असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, तंबाखू चा व्यापार करणाऱ्यांची मुजोर भूमिका, यामुळे आमच्या विभाग यावर कारवाई करू शकत नाही." ही भुमिका जिल्हा अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी पत्रकारांसमोर घेतली आहे. त्यात तथ्य असावे असे आजपावेतो वाटत होते. परंतु मोजके काही लोक या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत, त्या मोजक्याच लोकांचे येणे-जाणे या विभागात नेहमीच असते असे अनेकदा बघण्यात आले आहे. सुगंधित व्यापार करणाऱ्यांचे दुकान, गोडाऊन यांची संपूर्ण माहिती जिल्हा अन्न व प्रशासन विभागाला असतांना त्याकडे होत असलेली डोळेझाक ही या विभागावर संशय निर्माण करणारी आहे.

जिल्ह्यात अवैध व्यवसायाला "परवानगी"?

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतर परवानगी असणारेच व्यवसाय करू शकत होते, जिल्ह्यामध्ये दारू विक्री साठी बनलेल्या मोहल्ला कमिट्या त्यात सक्रिय असलेले या साऱ्यांबद्दलचे वृत्त वर्तमान पत्रात प्रकाशित झाले होते, त्या संबंधात तत्कालीन गृहमंत्र्यांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. दारूविक्री मध्ये समाविष्ट असलेले "ते" आता काय करीत आहेत. याचाही विचार व्हायला हवा. अवैध व्यवसायासाठी जिल्ह्यात मिळणारी "परवानगी"? हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यामध्ये दारूबंदी हटविल्यानंतर सट्टा व्यवसाय, ऑनलाइन क्रिकेट सट्टा, सुगंधित तंबाखू यांनाही अशीच परवानगी देण्यात आली आहे कां? यामागे राजकीय वरदहस्त आहे कां? याचाही तपास वरिष्ठ तपास यंत्रणेकडून व्हायला हवा. कोणताही अधिकृत व्यवसाय नसतांना काही मोजक्या लोकांकडे वाढलेली संपत्ती हा जिल्ह्यात संशोधनाचा विषय आहे.

Post a Comment

0 Comments