कोळसा चोरी जोरात, नागाडा व पडोली कोळसा टालावर मोठ्या प्रमाणात कोळसा जमा!

कोरोनाच्या भरतीवर देशात कर्फ्यू लागल्यानंतर पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. देश कोरोना ने त्रस्त झाला आहे परंतु या सर्वांना धाब्यावर बसवून कोळसा चोर कोळसा खदानीतून मनमानी कोळशाची नियमबाह्य उचल करीत आहे.
चंद्रपुरातील पडोली व व नागाडा येथे कोल डेपोवर या बंद चा फायदा उचलून सबसिडी चा कोळसा जमा करण्यात आला. चंद्रपुर डी.आर.सी. च्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सबसिडीच्या कोळशाची उचल होत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार देशात lock down दरम्यान संपुर्ण वाहतुक बंद असताना ही या खाणीतुन कोळशाची उचल करण्यात करून ती रात्रोच्या अंधारात कोल डेपोवर जमा करण्यात येत होती. हे काम कोळसा चोर साखळी बनवून करीत असल्याची माहिती आहे. याबद्दल यापुर्वीही वृत्ताच्या माध्यमातुन या चोरीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर ही कोळसा चोरांनी ही चोरी सर्रास सुरू ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकतीच अत्यावश्यक सेवा शासनाच्या आदेशाने सुरू करण्यात आली आहे. विज उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. त्याठिकाणी लागणारा कोळसा वाहतुक करता यावा, असा नियम आहे, यासाठी वाहतुक करणार्या वाहनांना RTO मधून परवानगी घेणे गरजेचे आहे, कोळसा चोरांनी या नियमाला धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट दिसत आहे. D.O. च्या नियमांचे उल्लंघन करून रात्रो खाणीतुन गाड्या load करून पहाटे त्या कोल डेपोसाठी सोडल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कार्यालयीन वेकोली अधिका-यांना शिथीलता देण्यात आली आहे. काही मोजके कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी आपली ड्यूटी बजावत आहे, याच संधीचा फायदा घेत वेकोलीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना "आशिष" देवून ही कोळसा चोरी जोरात सूरू आहे. चंद्रपुर drc व mkc  येथून मनमानी कोळसा डोहाळल्या जाऊन तो पडोली व नागाडा येथील कोल डेपोवर रिकामा करून चोर बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकून कोळसा चोर मालामाल तर वेकोलीला कंगाल करण्याचे कार्य भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चंद्रपुर G.M. खाणीत सूरू आहे, यावर त्वरित निर्बंध लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments