संचारबंदी नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कालचा आदेश आज रद्द


६ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने इलेक्ट्रिक, हार्डवेअर, स्टेशनरी, हार्डवेअर, लॉन्ड्री व मोबाईल दुरुस्ती दुकाने मर्यादित स्वरूपात, विशिष्ट दिवसांवर उघडण्याबाबत निर्णय घेतला होता. तथापि रस्त्यावर होणारी गर्दी व यासंदर्भात यंत्रणांकडून आलेला फीडबॅक बघता केवळ जीवनावश्यक भाजीपाला,किराणा, दुध आदी दुकान सकाळी 7 ते 2 सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजीचा आदेश मागे घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे. 
सोमवार दिनांक सहा एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी काही दुकानांना परवानगी देऊन ती खोलण्याचे आदेश काढले होते. परंतु रस्त्यावर जमा झालेली गर्दी वाहनांची वाहतूक यामुळे रस्त्यावर जमावबंदी कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती आज चंद्रपूर करांनी रस्त्यावर येऊन सोशल डिस्टन्सीगन चा फज्जा उडविला. या सगळ्या बाबी बघून जिल्हाधिकारी महोदयांनी नुकतेच सदर आदेश रद्द करून संचारबंदी ठेवली आहे.
महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सद्यपरिस्थितीत कोणताही कोरोना चा रुग्ण नाही. येणारे काही दिवस दक्षता घ्यावी लागणार आहे. परंतु काही नागरिकांकडून सोसायटी डिस्टन्सीग च्या नियमांचे उल्लंघन होत असताना दिसत आहे. नुकतेच केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये पैसे जमा केले ते काढण्यासाठी लोकांनी बँकेसमोर लाईना लावल्या होत्या. मिळालेले पैसे काढून घेतले जातील अशी मूर्खपणाची अफवा  ही काही भागात पसरली होती. त्यामुळे कां असेना लोकांनी आज तोबा गर्दी केली. या सर्व बाबीचा विचार करून जिल्हाधिकारी महोदयांनी कालचा आदेश आज त्वरित रद्द केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या