अखेर रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्या रेती साठ्यावर उपविभागीय अधिकारी यांची जब्ती ?
इतरत्र ठेवलेला  रेती साठा सुद्धा होणार जब्त,हायवा ट्रक व इतर मशीन सुद्धा जब्त होण्याची शक्यता. 

सर्वप्रथम "भूमिपुत्राची हाक" न्यूज पोर्टल ने घेतली होती रेती तस्करी ची दखल!

भद्रावती :- तालुक्यातील सर्व रेती घाटावर आपला जणू मालकी हक्क असल्याची दबंगिरी करणारे रेती माफिया वासुदेव ठाकरे यांनी तहसीलदार महेश शितोळे यांच्या सोबत भागीदारी करीत  त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रतिस्पर्धी ट्रक्टर मालकांचे ट्रक्टर पकडून त्यांना  देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान रचले व  रेती चोरीत एकाधिकारशाही चालविलेली असल्याने त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे काही लोकांनी तक्रार दिली असल्याची माहीती आहे. विशेष म्हणजे ज्या तहसीलदार शितोळे यांच्याकडे राष्ट्रीय संपत्तीचे सरक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच तहसीलदार आपल्या कर्त्यव्याला मूठमाती देत रेती माफिया सोबत मिळून रेती चोरीत कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल  रेती माफियाच्या घशात घालत आहे, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे, महत्वाची बाब म्हणजे नायब तहसीलदार काळे सुद्धा या रेती प्रकरणात सहभागी असल्याचे व्रूत्त आहे. आणि म्हणूनच उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी काल सकाळी रेती माफिया वासुदेव ठाकरे याच्या काही रेती साठ्यावर धाड टाकून तो सील केला आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी रेती साठा पडलेला असून त्या रेती साठय़ावर सुद्धा जब्तीची कारवाई करणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे.

 सर्वप्रथम राजू कुकडे संपादक असलेल्या "भूमिपुत्राची हाक" न्यूज पोर्टल ने या रेती तस्करी ची दखल घेऊन "वासूदेव" या रेती माफियांच्या पर्दाफाश केला. त्यानंतर प्रशासन हरकतीत आले.

वासुदेव ठाकरे हे केवळ रेतीच चोरी करीत नसून ते कर्नाटका एम्टा च्या कोळसा चोरीत सुद्धा सहभागी होते अशी माहीती असून त्यांनी आपल्या वीट भट्टी परिसरात वीज चोरी सुद्धा चालविले ली आहे. आणि त्याहून मोठी बातमी म्हणजे यांच्या गाडीने नोव्हेंबर २०१९ मधे  चारगाव परिसरातील पुलाखाली झालेल्या वाघाच्या म्रूतू मधे सहभाग असल्याने ते प्रकरण सुद्धा समोर येणार असल्याची माहीती आहे .

Post a Comment

0 Comments