राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने!




महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलायले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे.

हा किस्सा आहे, महाराष्ट्रातील बीडच्या खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्या हिंदीचा! 

त्या काही कारणानिमित्त इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. त्या इंदिरा गांधींच्या कार्यालयात जात असतानाच इंदिराजींचा पारा काही कारणाने चढलेला होता आणि त्यांनी हातातली पेन्सिल टेबलवर आपटत कार्यालयातील शिपायाला दरडावले, हे केशरबाईंनी बघितले. इंदिराजींचा पारा चढलेला असतांना त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम होणे शक्य नाही असे केशरबाईंना वाटले. तेव्हा केशरबाई इंदिराजींना नमस्कार वगैरे करून लगेच जायला निघाल्या. तेव्हा इंदिराजींनी त्यांना विचारले, "केशरबाई आप इतने जल्दी वापस क्यू जा रही है?" 

त्यावर केशरबाईंचा प्रतिसादः "आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे बात करने का ये टाइम ठिक नही"

अर्थातच इंदिराजींना "आपटी" म्हणजे काय ते कळले नाही आणि केशरबाईंनी त्यांना पेन्सिल आपटून दाखवली आणि अर्थ सांगितला. तेव्हा इंदिराजी खळखळून हसल्या. नंतर अनेकदा केशरबाईंना त्या "आज मैने पेन्सिल आपटी नही तो आप अपनी बात केह सकती है" असे गंमतीने म्हणत असत. 

Post a Comment

0 Comments