विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्‍यात यावी!



आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्याशी चर्चा

सकारात्‍मक कार्यवाहीचे मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍वासन

विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्‍यात यावी तसेच राज्‍यातील 14314 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्‍य यांना सहा महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली. या संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याशी दुरध्‍वनी द्वारे विस्‍तृत चर्चा केली. या दोन्‍ही मागण्‍या संदर्भात सकारात्‍क कार्यवाहीचे आश्‍वासन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.

दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली आहे. या मंडळांना मुदतवाढ न दिल्‍यास पुरवणी मागण्‍यांमध्‍ये निधी वितरणासंदर्भात विदर्भ व मराठवाडयावर आर्थिक अन्‍याय होण्‍याची भिती निर्माण झाली आहे. संविधानाच्‍या अनुच्‍छेद 371/2 नुसार विकास खर्चाचे समान वाटप व साधन संपत्‍तीचे न्‍याय्य वाटप तसेच सर्व विभागांचा समतोल विकास यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या मंडळांच्‍या स्‍थापनेमागील मुळ उद्देश सफल व्‍हावा व या विभागातील जनतेला योग्‍य न्‍याय मिळावा या दृष्‍टीने वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments