- 100 बाधित झाले बरे !
- 98 वर उपचार सूरू !
चंद्रपूर : चंंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी ११ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत १८७ असणारी बाधितांची संख्या वाढून आता १९८ झाली.जिल्ह्यात सध्या उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०० आहे. तर सध्या उपचार सुरु असणाऱ्या बाधितांची संख्या ९८ आहे. त्यापैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे १० जवान व ५ जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १० बाधिताचा समावेश आहे. यामध्ये बापट नगर, वडगाव पोलीस चौकी जवळील ३२ वर्षीय महिला, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या कामावर असलेल्या तिघांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहे. सध्या पागल बाबा नगर परिसरात कार्यरत असणाऱ्या २८ ,३२ व २३ वर्षाच्या अनुक्रमे तीन पुरुषाचा बाधितात समावेश आहे. राज्य राखीव दलाच्या आणखी दोन २५ व २९ वर्षाच्या जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्य राखीव दलाचे या दोनसह एकूण दहा जवान चंद्रपूरमध्ये आल्यानंतर तपासणीमध्ये पॉझिटिव्ह ठरले आहे चंद्रपूर शहरातीलच घुटकाळा तलाव परिसरातील यवतमाळ येथून परतलेले ६२ वर्षीय पुरुष, एका खासगी रुग्णालयात आता पर्यत वैद्यकीय उपचार घेत असलेले साईबाबा मंदिराच्या मागील ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पुणे येथून प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या ५८ वर्षीय आझाद हिंद चौक येथील गृह अलगीकरणातील महिला तसेच राजस्थान येथील रहिवाशी असणाऱ्या म्हाडा कॉलनीतील संस्थात्मक अलगीकरणात असणारा २६ वर्षीय पुरुष व ताडाळी जवळील ऊर्जाग्राम येथील संपर्कातील ५० वर्षीय नागरिकाचा आजच्या ११ पॉझिटिव्ह मध्ये सहभाग आहे.
आजच्या ११ बाधितांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याबाहेरील बाधिताची संख्या सहा आहे. यापूर्वी ९ जण बाहेरचे होते. त्यामुळे १९८ पैकी १५ बाधित अन्य जिल्हयाचे व राज्याचे आहेत .
दरम्यान , जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ ) ८ जुलै ( एकूण ५ ) ९ जुलै ( एकूण १४ ) १० जुलै ( एकूण १२ ) ११ जुलै ( एकूण ७ ) १२ जुलैला ( एकूण १८) व १३ जुलैला ( एकूण ११ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १९८ झाले आहेत. आतापर्यत १०० बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १९८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ९८ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
0 टिप्पण्या