पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज गोसेखूर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मिटर उघडले!


(संग्रहीत छायाचित्र.)

  1. आजुबाजूच्या क्षेत्रातील गावांना दिला सतर्कतेचा इशारा !
  2. धरण नियंत्रणाकरीता बाळगली सावधगिरी !
चंद्रपूर : आज गुरूवार दि.06 अॉगस्ट 2020 ला गोसेखूर्द धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण नियंत्रणाकरीता आज 4:00 वाजता गोसेखूर्द धरणाचे 23 दरवाजे 0.50 मि. नी उघडण्यात आले असून 2555 cumecs विसर्ग आहे. Dam Foot Power House 160 cumecs, RBC power House 20 cumecs असुन विसर्ग 2735 क्यूमेक्स (96587 क्युसेस) प्रवाह सोडण्यात आले आहे, नदी काठावरील गावांना याबाबत सतर्कतेचा ईशारा देण्यात आहे, अशी अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्याची धरण पातळी 243.820 m, आजचा उपयुक्त पाणीसाठा : 412.781 MCM, उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : 55.77 % इतका असल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकतेच मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती दिली होती.

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उभ्दवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क आहेत.तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन ही नाम. वडेट्टीवार यांनी केले आहे. मुंबई 5, कोल्हापूर 4, सांगली 2 , सातारा 1, ठाणे 1 ,पालघर 1 , नागपूर 1,रायगड 1 अशा एकूण 16 एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गोसेखुर्द धरणाची पातळी नियंत्रणाकरिता ही सावधगिरी बाळगण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments