रानडुक्कर च्या मासांची विक्री प्रकरणी 2 आरोपींना अटक !



  • बल्लारपूर वनविभागाची कारवाई !

बल्लारपूर : शुक्रवार दि. 07 आॅगस्ट 2020 रोजी कोठारी गावालगत रस्ता अपघातात मृत झालेले रानडुक्कर मोटारसायकलने लावारी येथे आणुन त्यास कापुन विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतांना शिवराम राजीराम गडमवार रा. लावारी व गंगाराम रामदास टेकाम रा. लावारी यांना वनकर्मचारी क्षेत्र सहाय्यक ए. डी. मल्लेलवार, वनरक्षक मनोहर धाईत, राकेश शिवनकर, आईटलावार, व प्रतापगिरवार यांनी अटक केली. यावेळी आरोपी शिवराम राजीराम गडमवार रा. लावारी, गंगाराम रामदास टेकाम रा. लावारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांचे कडुन रानडुक्कर वन्यप्राण्याचे मांस 8 kg, कुन्हाड, सुरी, वजन मापे 500 gm दोन नग, तराजु काटा, जर्मन गंज 2 नग, मोटारसाईकल इत्यादी जप्ती करुन वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44 व 51 अन्वये वनगुन्हा क्र. 8/18 नोंद करुन आरोपीना बल्लारपुर न्यायालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपास उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांचे मार्गदर्शनात बल्लारशाह चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करित आहे.

Post a Comment

0 Comments