दारूवाल्यांना हप्ता मागणाऱ्या "त्या" नगरसेविकेच्या "पती(?)" ची गडचांदूरात खमंग चर्चा !



  • गडचांदूर चे पो. नि. गोपाल भारती यांचा दारू विक्रेत्यांशी सांठ-गांठ असल्याचा आरोप !
  • भारती यांनी बदलीनंतर (?) मिळविलेले एक्स्टेंशन चर्चेचा विषय!
  • आता गडचांदूर पोलिस स्टेशन ची धूरा कोण सांभाळणार, गडचांदूरात चर्चा !

गडचांदूर : मागील काही दिवसापासून गडचांदूरात दारूवाल्यांना घरी बोलावून पोलिसांना देता तर आम्हाला का नाही? अशी मीटिंग घेणाऱ्या "त्या" नगरसेविकेच्या पती (?) ची खमंग चर्चा गडचांदूर मध्ये सुरू आहे. राजू कुकडे संपादित साप्ताहिक भूमिपुत्राची हाक या न्युज पोर्टल ने दोन दिवसांपूर्वी "पोलिसांना देता तर आम्हाला ही द्या.. नेत्यांनी मागितला आपला अधिकार??" या मथळ्याखाली बिनधास्त व निर्भिड वृत्त प्रकाशित केल्यानंतर "हाच तो" नालायक? आता याचा "ताक" लवकरचं "सांड"णार, याबाबत खमंग चर्चा गडचांदूरात सुरू आहे. एखाद्या नगरसेविकेच्या पतीने चक्क दारूवाल्यांना घरी बोलावून हप्ता मागणे व पोलिसांना देता असे म्हणणे हे वर्तन शोभणारे नाही आणि ही गोष्ट गडचांदूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण करणारी आहे. गडचांदूर चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या कर्तव्यावर सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. दारू, सट्टा, जुगार चालविणाऱ्या सोबत पोलिस निरीक्षकांची असलेले हितसंबंध हा नेहमीचं चर्चेचा विषय राहिला आहे. वृत्तांच्या माध्यमातून यावर वेळोवेळी प्रकाश ही टाकण्यात आला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार गोपाल भारती यांची गडचांदूर येथून बदली झाली असून त्यांनी ही बदली काही दिवसासाठी थांबवून ठेवली असल्याचे वृत्त आहे. गोपाळ भारती यांच्या बदलीनंतर(?) मिळालेले एक्सटेंशन कशासाठी याबाबत विविध चर्चा गडचांदूरात रंगल्या आहेत. भारतीनंतर कोण सांभाळणार गडचांदूर पोलिस स्टेशनची धुरा यावर येणाऱ्या काही दिवसांत पडदा उठणार हे निश्र्चित!

दारूवाल्यांशी नगरसेविकेच्या पतीच्या झालेल्या मीटिंग संदर्भातील वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही गडचांदूर च्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, भाजपचे सतीश उपलेंचीवार, अरुण डोहे, काँग्रेसचे नगरसेवक राहुल उंबरे, मनसेचे लिंगु महाराज व अन्य प्रतिष्ठित यांचेशी यावर चर्चा केली, त्याबाबत मान्यवरांनी आपापले मत-मतांत्तरे उघडकीस आली, ती जशीच्या तशी आमच्या वाचकांसाठी याठिकाणी देत आहोत.

यासंदर्भात सत्ताधारी काँग्रेसचे गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम यांनी सदर वृत्त आपल्या मोबाईल वर झळकले म्हणून आपण वाचले असून याबद्दलची कोणतीही माहिती आपल्यापाशी नाही माहिती घेऊन तत्संबंधाने कळवितो अशी मोजकी व बोलकी प्रतिक्रिया दिली. गडचांदूर न. प. चे उपाध्यक्ष शरद जोगी (रा.काॅं) यांनी सदर प्रकरण होऊ शकते. हे घातक आहे अशी प्रतिक्रिया दिली तर काँग्रेसचे रोहित शिंगाडे, नगरसेवक राहुल उमरे यांनी हा सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे चौकटीतील उत्तर दिले. भाजपचे सतीश उपलेंचवार व नगरसेवक अरुण डोहे यांनी यासंदर्भात काहीही माहीत नसल्याचे सांगत आपले हात वर केले. मनसेचे लिंगु महाराज यांनी आपली तिखट प्रतिक्रिया देताना ही बाब लोकशाहीला घातक असून ज्या जनतेमधून तुम्ही निवडून गेले आहात त्या जनतेसोबत हा विश्वासघात असून समाज सेवेसारखे व्रत हाती घेणाऱ्यांनी अशी कृत्य करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी अनेकांनी टाळाटाळ केली तर काही नाव न सांगण्याच्या अटीवर गडचांदूर मध्ये होणारी अवैध दारू विक्रीवर प्रकाश टाकला. गबचांदूरमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने दारू चा व्यवसाय सुरू असून यामध्ये अनेकांचे हात रंगलेले आहेत. आत्ताचा एक नगरसेवक व दोन माजी नगरसेवक या व्यवसायात आता पोलिसांशी संगनमत करून सक्रिय झालेले आहेत अशी गोपिनाय माहिती यावेळी सांगण्यात आली. ज्यांच्याबद्दल ही चर्चा सुरू आहेत ते यापूर्वी अशाच व्यवसायात सक्रिय होते अशी पुष्टीही ही त्यांनी यावेळी जोडली.

Post a Comment

0 Comments