एका दगडात दोन पक्षी मारण्याची किमया बंद करा, शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या!!#gadchandur  • भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे यांचे मुख्याधिकारी व अध्यक्ष यांचेकडे साकडे!
  • कोरोना एवढाच स्वच्छतेचा विषयसुद्धा महत्त्वाचा हे विसरू नका !
  • गडचांदूर शहरात स्वच्छतेकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप !

गडचांदूर : गडचांदुर शहरात मागील चार महिन्यापासून नालीची योग्य साफसफाई केली जात नाही. सफाई केल्यास त्या कचऱ्याची उचल केली जात नाही. मागील चार महिन्यापासून फाॅगिंग मशीन बंद असून ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही. साध्या पंपाने फवारणी करीत असल्याचे काही दिवसापूर्वी होत असलेले दर्शन ते सुद्धा दुर्लभ झाले आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता अमरावतीवरून आलेल्या जावयाची आपल्या आरोग्य विभागाने खबरदारी जास्त घेतली, त्यामुळे एवढे रुग्ण वाढीस आले हे नाकारता येत नाही. अश्याच प्रकारे स्वच्छतेच्या ठेकेदारांची खबरदारी घेत असल्याचे चिन्ह दिसत आहे. स्वच्छतेचे काम बंद करून मजूर कोरोनाच्या कामात वापरल्या जात आहे. कोरोना हा विषय जेवढ्या महत्वाचा आहे तेवढाच स्वच्छतेचा सुद्धा आहे हे विसरू नका, शहराच्या स्वच्छतेकरिता लाखो -करोडो रुपये दिल्या जात आहे, तेव्हा शहराची योग्य साफसफाई होणे गरजेचे आहे. कोरोना करिता शासनाकडून विशेष निधी दिली असताना त्याचे काम वेगळे ठेकेदाराकडून न करता याच ठेकेदाराकडून स्वच्छतेचे काम बंद करून करण्याचा हेतू काय ?
एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हेतू तर नाही नां अशी शंका भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी व्यक्त केली आहे. जिकडे तिकडे कोरोना सोबतच डेंगू मलेरिया, डायरिया, चिकणगुणियासारखे आजार पसरत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत असून अशा रोगाला दूर ठेवण्यासाठी शहराच्या स्वच्छतेकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे त्याकरिता भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,आरोग्य सभापतींना निवेदनातून विनंती केली आहे. आता यावर खरच लक्ष देतील काय ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments