भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना !
मुंबई : माजी अर्थमंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चाचणीनंतर त्यांनी घरातच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. यापूर्वी मुंबईतील त्यांचे कारचालक आणि कूक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहणे टाळले होते; मात्र आता त्यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून काळजी करण्याचे कारण नाही; मात्र जे जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात एक ऑगस्ट रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला, आज जिल्ह्यात मृतकांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. सात हजाराच्या आसपास बाधितांची संख्या आहे. 1 मे रोजी चंद्रपुरात पहिला बाधित रुग्ण मिळाला होता. तेव्हापासून आजपावेतो जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर वारंवार टीका होत आहे. मृतांचे नातेवाईक सेंटरवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. जिल्ह्यात स्वतःहून सामोरे यायला नागरिक धजावत नाही आहे, आरोग्य यंत्रणेवरील विश्वास उडाला असून यावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या अपुरी आहे असे सांगितले जाते. बाधितांची व मृतकांची संख्या वाढत असताना सुद्धा कोविडविषयी दररोज नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. सभा, सल्ले, नवनवीन योजना यांना जिल्ह्यात ऊत आला आहे परंतु सकारात्मक काही घडतचं नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ज्यांचे वर यांची जबाबदारी आहे त्यांनी सामान्य जनतेसाठी हात वर केल्याचे चित्र आज जिल्ह्यात बघायला मिळत आहे. अन्य आजारातील रुग्णांनाही कोविड चाचणी करायला भाग पाडल्या जात आहे. नुकतेच समजातून झालेल्या हल्ल्यात कोविड चाचणीच्या फंद्यात यादव नावाच्या एका होतकरू तरुणाचा मृत्यू झाला. कधी शंभर खाटांचे अतिरिक्त व्यवस्था, कधी जम्बो कोविड सेंटर, कधी कंत्राटी आरोग्य व्यवस्था अशा भुलथापांचा जिल्हावासियांना रोज सामना करावा लागत आहे.
फक्त घोषणांचा "पाऊस", भितीने अनेक खाजगी रूग्णालये बंद तर 50 पेक्षा जास्त डॉक्टर "पॉझिटिव्ह !
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची भीषणता वाढली असतांनाचं पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि जिल्ह्यातील आमदारांनी प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. चर्चा झाल्या. सल्ले दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही फक्त घोषणांचा पाऊस पडला. केवळ "खरेदी" हाच कोविडवरील उपचार आहे, अशा तऱ्हेने या बैठका पार पडत आहे. आता चाळीस खाटांचे कोविड केअर सेंटर सिद्धार्थ हॉटेलजवळ निर्माण करीत आहे. यात शहरातील खासगी डॉक्टरांची सेवा आपत्ती व्यवस्थापन असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद केली. ते आता मनपाला सेवा देणार काय? याबाबत मनपाचे अधिकारीच साशंक आहे.
आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक !
शासकीय महाविद्यालयातील अनास्थेला बघता जिल्हाधिकाऱ्यांनी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपविभागीय दंडाधिकारी यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याचे समजते. रुग्ण व त्यांच्या नातलगांना काही समस्या असल्यास त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना तात्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातलगांसाठी मदत कक्षही उभारण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments