गर्भाशयाचा जिवघेणा त्रास, कोविडमुळे रखडले "अॉपरेशन!



  • मुळ आजारांवर उपचार न करताचं दिला "डिस्चार्ज" !
  • रूग्ण विव्हळतो वेदनेने अन् डॉक्टर कारण सांगतात "कोरोना"चे !
  • वैद्यकीय महाविद्यालयातील अनास्थेचे उदाहरण !

"कोरोना" नावाचा आजार,
त्याचा मांडून ठेवला "बाजार" !

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात राहणाऱ्या एका महिलेला गर्भाशयाच्या त्रास होता. वेदनेने विव्हळत असतांना या महिलेच्या कुटुंबाने आर्थिक बंदोबस्त करून खाजगी मध्ये ऑपरेशन करण्याचे ठरविले. त्रास वाढल्यामुळे या महिलेला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता दाखल करण्यात आले. गर्भपिशवी खराब झाल्यामुळे हा त्रास वाढला होता. खाजगी डॉक्टरने ऑपरेशन करावे लागते असे सांगितले. ऑपरेशन बाबतच्या संपूर्ण चाचण्या झाल्या आणि सुदैवाने त्या नार्मल ही निघाल्या. खाजगी डॉक्टरने सध्याची कोरोना स्थिती बघता कोविड चाचणी ची नियमाप्रमाणे अट टाकली. त्याच दिवशी दुपारी चार वाजता डॉक्टर ऋषिकेश कोल्हे व त्यांचे टेक्निशियन यांनी कोरोना चे सॅम्पल घेतले. एक तासानंतर कोरोना positive असल्याच्या अहवाल फोनवर देण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता गर्भाशयाच्या त्रासाने विव्हळत असलेल्या या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या या महिला रूग्णाला बुधवार दि. 16 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज गर्भाशयाच्या वेदनेने विव्हळत असलेली ही महिला गर्भाशयाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंताचे उंबरठे झिजवित आहे. मूळ आजारावर उपचार झालाचं नाही व वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज करण्यात आला. आज रविवार दि. 20 सप्टेंबर वृत्त लिहीस्तोवर या महिलेला कुठेही ही तिच्या मूळ आजारावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले नाही. गर्भाशयाच्या त्रासाने विव्हळत असलेली ही महिला त्यांचे कुटुंब या स्थितीपर्यंत फक्त डॉक्टरांचे उंबरठे झिजवित आहे. कोरोना बरा होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते आता याच रुग्णालयात गर्भाशयाचा ही उपचार होईल अशी "भाबडी" अपेक्षा बाळगून असणारी ही रूग्ण महिला व तिचे कुटुंब आज भयावह स्थितीचा सामना करीत आहे.

शल्य चिकित्सक डॉ. राठोड
यांचेकडून ही निराशा !

मूळ आजार असलेल्या गर्भाशयावर कोणताही उपचार न करता सुट्टी देण्यात आल्यामुळे रुग्ण महिलेचे कुटुंब, काही समाजसेवक यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करित आहे. परंतु राठोड साहेब त्यांच्या कोणत्याच फोनवर उत्तर देत नाही. मेसेज चे उत्तर देत नाही, ही आरोग्य विभागासाठी फार मोठी शोकांतिका आहे. घरातील एखादा व्यक्ती वेदनेने विव्हळत असेल तर कुटुंबाला डॉक्टरांची साथ घ्यावी असं वाटते. परंतु आजची स्थिती-परिस्थिती वेगळी झाली आहे. "मृत्यूच्या दाढेतून रूग्णाला खेचून आणणारा" अशी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रतिमा होती. मार्च महिन्यानंतर ही प्रतिमा आता "जीवाची नाही तर "यमा"चे साथीदार" अशी डॉक्टरांची जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. भूमिकेमध्ये सुधार आवश्यक आहे. सेवा उद्योगाचा दर्जा असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा जनसामान्य बाळगून आहे. गर्भाशयाच्या वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेला तोडगा काढून तिच्यावर उपचार करण्यात यावे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवी मान्यवरांनी पुढाकार घ्यावा.

Post a Comment

0 Comments