महाराष्ट्र मेट्रो चे संपादक रोहीत तुराणकर यांचेवर दारूविक्रेत्यांचा प्राणघातक हमला !



  • तलवारीने केला जिवे मारण्याचा प्रयत्न !
  • हमला करणारा आरोपी आर्मी च्या सेवेत असल्याची माहिती !
  • वाढई परिवाराचा इंदिरानगर-शामनगर परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय !
  • आरोपींवर 324 अंतर्गत गुन्हा दाखल, कडक कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना निवेदन !
  • दारू तस्करीची साखळी तोडण्याचे राहील पोलिस अधिक्षकांना तगडे आवाहन !

चंद्रपूर : महाराष्ट्र मेट्रो चे संपादक रोहीत तुराणकर यांचेवर शुक्रवार दि. 18 सप्टेंबर रोजी इंदिरानगर-शामनगर परिसरातील अवैध दारू विक्री व दादागिरी करणाऱ्या पिंटू, सतिश व प्रदीप वाढई यांनी तलवारीने हमला केला. या प्राणघातक हमल्यात रोहीत ची आई हिला ही सुद्धा जखमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी पिंटु वाढई यांना अटक केली असून तो आर्मी मध्ये नोकरीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींविरूद्ध भादवि कलम 324 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके यांनी पत्रकार संघाला सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील इंदिरानगर-शामनगर परिसरात पिंटु, सतिश व प्रदिप वाढई यांचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांच्यात दारू साठा पोलिसांकरवी पकडण्यात आला होता त्याच्याचं बदला घ्यायच्या हा हेतू बाळगून शुक्रवार दि. 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मेट्रो चे संपादक रोहीत तुराणकर यांचेवर शामनगर येथील पिंटू, सतिश व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चक्क तलवारीने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात रोहित तूराणकर यांच्या आई ला सुद्धा दुखापत झाली असून जर वेळीच त्या ठिकाणी लोक धावून गेले नसते तर आरोपीने रोहीत तुराणकर यांचा जिव घेतला असता.
या विरोधात रामनगर पो.स्टे. येथे अपराध क्र. 896 अन्वये भा.दं.वि. च्या कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वी ही दारू विक्री व अन्य प्रकारचे अपराधिक गुन्हे आहे. ज्या परिसरात हे दारू व्यावसायिक दारूचा व्यवसाय करतात, त्या ठिकाणी त्यांची दहशत असल्यामुळे कोणीही समोर येण्यास धजावत नाही. यापूर्वी ही दि. 04/09/2020 रोजी पत्रकार रोहीत तुराणकर यांचेवर याच आरोपींनी वाहनाने कुचलुन मारण्याचा प्रयत्न ही करण्यात आला होता. त्या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून सदर प्रकरणात त्यावेळी भादंवि च्या कलम 294 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या आरोपींनी पत्रकार रोहीत तुराणकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार हमला करणारा पिंटू वाढई हा आर्मीमध्ये नोकरीला असून त्याचे कुटुंब दारूच्या व्यवसायात सक्रिय आहे. काल झालेल्या हमल्यामध्ये पिंटू ने तलवारीने वार केला तर त्याचे दोन बंधू त्यावेळी त्याला प्रोत्साहन देत होते व त्यांनी ही रोहित यांच्या आईला मारझोड करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्वरित रामनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून बाकी आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच चंद्रपूर ला नवीन पोलीस अधीक्षक म्हणून साळवे हे नियुक्त होणार आहे नवीन पोलिस अधीक्षकांना समोर दारू विक्रेत्यांची साखळी करण्याचे मुख्य आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात आज पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना सोमवार ला निवेदन देण्यात येणार आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या आशयाचे आज रामनगर पोलीस ठाणेदार हाके यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली. विशेष बाब म्हणजे पत्रकार रोहीत तुराणकर हे कोरोना काळामध्ये पोलिसांचे सहकारी म्हणून कार्यरत होते, त्यांनी या काळामध्ये निशुल्क पणे पोलिसांना सहकार्य केले व त्यांनी त्यांना कोरोना योद्धा या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments