- शासनाच्या नियमांचे पालन करा !
- जिल्हा आरोग्य अधिकारी राज गहलोत यांचे जिल्हावासीयांना आवाहन !
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोणा बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घाबरण्याचे कारण नाही, चाचण्यांसाठी समोर या, मनामध्ये भीती बाळगू नका, आरोग्य विभागाची टीम प्रामाणिकपणाने आपले कार्य बजावीत आहे. फक्त शासनाचे नियम पाळा, बाहेर निघतांना मास्क अवश्य वापरा. रुग्णांची संख्या वाढत आहे, याचा अर्थ चुकीचा घेऊ नका असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी एका मुलाखतीत केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात आहे, यासंदर्भात काही दिवसापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांची online मुलाखत घेण्यात आली होती, त्या मुलाखतीचा काही अंश आमच्या सुज्ञ वाचकांसाठी....
जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची चाचणी होऊन राहिली आहे. रोज दोनशेच्या आसपास बाधित मिळत आहे. दोनशे गुणी ला चार अशी संख्या पकडली तरीही हजारो बाधितांची चाचणी दररोज जिल्ह्यामध्ये होऊन राहिली आहे. त्यामुळे ही संख्या वाढत असून घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग हा त्यांच्या पाठीशी आहे. कोरोना ही महामारी आहे परंतु त्यावर नियंत्रण आणणे शक्य आहे. फक्त जनजागृतीची या प्रकरणी आवश्यकता आहे. यावर नियंत्रण हे तुमच्या-माझ्या हातात नाही, जबाबदारीने प्रत्येकांनी नियमांचे पालन केल्यास यावर नियंत्रण आणल्या जाऊ शकते, मास्क वापरणे ही काळाची गरज आहे. भारतामध्ये फक्त मास्क वापरल्यामुळे चार लाख मृत्यू थांबवू शकतो आणि 40% बाधितांची संख्या कमी करू शकतो. मास्क वापरल्यामुळे फक्त संरक्षण होत नाही तर आपण दुसऱ्याला बाधित होण्यापासून पण थांबवू शकतो अशी बोलकी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी यावेळी बोलतांना दिली.
पुढे बोलताना डॉ. गहलोत यांनी सांगितले की, फक्त मास्क वापरल्यामुळे ट्रान्समिशन कमी होऊ शकते. पब्लिक सरफेस मधून कॉन्टॅक्ट वाढत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी बिना मास्कने कुठेही ही जाण्यास टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क अवश्य वापरावे, चाचणीसाठी स्वतःहून समोर यावे, स्वतः सोबतच दुसऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, जनता कर्फ्युला सहकार्य करावे. असे आव्हान यावेळी त्यांनी बोलताना केले.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये हॉटस्पॉट ची संख्या वाढली आहे, त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या हॉटस्पॉट वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन आपले कार्य करून राहिले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. महामारी आली आहे ही महामारी जागतिक आहे ही फक्त आपल्या देशावर आली नाही. संपूर्ण विश्व या महामारी मध्ये होरपळला आहे. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नये. बाधित हे आपले नातेवाईक आहेत, त्यांच्याविषयी कोणतीही घृणा बाळगू नये, त्यांना आज आपल्या सहकार्याची गरज आहे. बाधितांना घृणास्पद वागणूक न देता त्यांच्या सहयोगाची भावना बाळगावी व नियमांचे पालन करून या महामारीवर आज जिल्ह्यात आलेल्या संकटावर मात करता येऊ शकते फक्त एवढेच सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे व प्रशासनाला योग्य सहकार्य केल्यास या परिस्थितीतून सुद्धा बाहेर आपण पडू शकतो, एवढी जाणीव नागरिकांनी यावेळी ठेवायला हवी. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन हे प्रत्येक जिल्हावासीयांना सोबत आहे. त्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून व नियमांचे पालन करुन या महामारीवर मात करावी असे आव्हान यावेळी डॉ. राज गहलोत यांनी मुलाखतीत दिले. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे त्यांनी शेवटी सांगितले.
या सगळे मिळून या महामारीला
हाकलून लावू या !
0 Comments