यावर्षीचा दसरा घरातचं !



  • कुटूंबासोबतचं दसरा साजरा करा !
  • पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांचे आवाहन !

संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे सावट आहे. या काळामध्ये सदैव मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. यावर्षी दसरा हा सण घरी राहूनच साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र एक करून कोरोना विरुद्ध लढाई देत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोरोना महामारी मध्ये लढणाऱ्या कोरोना योध्द्यांना साथ द्यावी. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबा समवेत घरातच राहून दसरा हा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या