- बल्लारपूरातील गणपती वार्डातील घटना !
- चंद्रपूर येथील खाजगी डॉक्टराचा प्रताप !
चंद्रपूर (वि.प्रति.) : बल्लारपुरातील गणपती वार्डात राहणाऱ्या भारती मराठे (३८) यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी चंद्रपूरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचाराअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली व घरी अंतीम संस्काराची तयारी ही सुरू झाली.
दरम्यान एका नातेवाईकाला शनिवारी रात्रो मृत घोषित केलेल्या महिलेच्या शरीरामध्ये हालचाल होतांना दिसल्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर त्या महिलेला उपचारार्थ रविवारी नागपूर येथे हलविण्यात आले. आता त्या महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे सांगीतल्या जाते. या घटनेने मराठे कुटुंबियांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. भारती मराठे या पोस्टाच्या एजेंट आहेत. नेहमीप्रमाणे त्या आरडीचे पैसे गोळा करायला निघाल्या. मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर हा प्रसंग उद्भवला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक संतापजनक घटना घडल्या आहेत. घडलेल्या या घटनेमुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
0 टिप्पण्या