महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लागणार मार्गी !



  • मंगळवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यता !
  • राज्य सरकारकडून मिळणार मदत !

मुंबई : महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मागील तिन महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्याच्या थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी थकीत वेतनाबाबत निर्णय होण्याची शक्यता असून त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन दिवाळीपूर्वी व्हावे, ही त्यांच्या कुटुंबाची गरज आहे. प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी सांगीतले होते. त्यानुसार एका बँकेला कर्जाचा प्रस्ताव ही दिला आहे, पण या प्रस्तावात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. एका अधिकाऱ्यानुसार महामंडळाने राज्य शासनाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबरचं एसटी च्या दैनंदिन खर्चासाठी एकूण ३,६०० कोटी रूपयांची मागणी केली होती. तसेच एका बँकेत कर्जाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात तांत्रिक अडचणी आल्या. यावर आता तोडगा निघाला असून मंगळवार पर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. तर राज्य सरकारकडून ३०० कोटी रूपयांचा निधीला मंजूरी मिळाली असल्याची अधिकृत माहिती आहे.

Post a Comment

0 Comments