गडचांदुरात बिनकामी राजकीय लोकांचा "जुगाराचा" क्लब, लाखोंची उलाढाल !



  • गडचांदुर पोलिसांचे "अर्थ"पूर्ण दुर्लक्ष !
  • परराज्यातून "जुवाऱ्यां"ची एन्ट्री, खाणे-पिणे-राहणे सर्व बिनधास्त !
  • जिल्ह्यातील मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक असल्याचा क्लब मालकाचा आव !
शहरातील तीन विविध राजकीय पक्षाच्या स्वयंभू पदाधिकाऱ्यांचा पुढाकार !

महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर शहरातील तीन विविध राजकीय पक्षाचे स्वयंभू पदाधिकारी हा क्लब चालवीत असून यातील एक पदाधिकारी आपण जिल्ह्यातील एका मोठ्या पुढाऱ्याच्या नातेवाईक असल्याचा "आव" दाखवून "झाडे" लावित आहे. सर्रासपणे जिल्ह्यातील या पुढाऱ्याचे आपण नातेवाईक कसे आहेत याचा उदोउदो करीत असतो. तीन विविध पक्षांचे हे स्वयंभू पदाधिकारी आपल्या पक्षाच्या व पदाचा गैरवापर करून हा क्लब चालवीत आहे. कोरपना रोडवर खुलेआमपणे सुरू असलेल्या या क्लबमध्ये रोजची लाखो रुपयाचे उलाढाल होत बंदी असलेला "रमी" हा जुगार याठिकाणी खेळला जात असून गडचांदूर पोलिसांनाही यातून त्यांची "बिदागी" मिळत असल्यामुळे गडचांदूर पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पक्षांच्या या तिन्ही स्वयंभू पदाधिकाऱ्यांचे "झाडे" त्यांच्या नेत्यांनी उखडून फेकायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे या संदर्भात पुराव्यानिशी तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे काही बिनकामी राजकीय लोकांनी जुव्व्याचा मोठा क्लब सुरू केला आहे. गडचांदूर शहराच्या भरवस्तीत हा क्लब सुरू असून या क्लबमध्ये परराज्यातून (आंध्रप्रदेश) मोठ-मोठे जुव्वारी लाखो रुपयाची रोकड घेऊन गडचांदूरच्या आत प्रवेश करतात. रोकड संपेपावेतो याठिकाणी ते वास्तव्यास असतात. त्यांचे खाणे-पिणे-राहणे सर्वांची व्यवस्था क्लबचे मालक बिनदिक्कतपणे करीत असतात. सध्या हा "जुव्वाऱ्यां" चा क्लब गडचांदूरात चर्चेचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोजची लाखो रुपयांची उलाढाल या क्लबमध्ये होत असून परराज्यातून येणाऱ्या जुवाऱ्यांची सर्व प्रकारची व्यवस्था या क्लबचे मालक या ठिकाणी करीत असतात. रोकड संपेपावितो त्यांचा मुक्काम हा गडचांदुरातचं असतो. शहरातील एका जुन्या बारमध्ये या लोकांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व अन्य व्यवस्था करण्यात आली असून त्याच्या शेजारीच असलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये दिवसा व रात्रो खुलेआम हे क्लब भरविल्या जाते परंतु याकडे गडचांदूर पोलिसांचे "अर्थ"पूर्ण दूर्लक्ष आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती यांचे या क्लब मालकांशी आर्थिक साटेलोटे असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून स्वतःला राजकीय पुढारी, नेते म्हणविणाऱ्यांनी अवैध-गैर व्यवसायात हातपाय मारणे सुरू केले आहेत. दारू, जुव्वा, कोंबड बाजार यामधून माया जमविण्याची जणू या स्वयंभू पुढाऱ्यांमध्ये होड लाली की काय? अशी स्थिती जिल्ह्यात बघायला मिळत आहे. गडचांदूर शहर ही यातून सुटलेले नाही.
(सविस्तर भाग -२)

Post a Comment

0 Comments