- कोरोना नियमांचे पालन करीत पार पडले ११ योग शिबीर
- आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य महानगर भाजपाचा उपक्रम.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, महानगर भाजपा तर्फे महानगरात ११ ठिकाणी आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ५१ योग शिक्षकांचा सोमवार(२१जूनला) जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आल्याने हा विषय अध्यात्मिक वर्तुळात चर्चेत आहे.विशेष म्हणजे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार याच्या हस्ते ५१ योग शिक्षकांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल व श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन२०१४ मध्ये,भारतातील योग विज्ञानाला जागतिक पातळीवर सन्मान मिळावा म्हणून भूमिका मांडल्यावर त्यास मान्यता मिळाली आणि जगातील१७८ देशांनी २१ जूनला योग दिवस म्हणून स्विकारले.तेव्हा पासून या जागतिक योग दिनाचे आयोजन केले जात आहे.
या ऐतिहासिक पवित्र दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तर्फे महानगरातील निर्माण नगर,गुरुदेव सेवा मंडळ राऊत लेआउट,हनुमान नगर,न्यू इंडिया कॉन्व्हेंट तुकुम,अग्रसेन भवन,अथर्व कॉलोनी,इंदिरा नगर,जोड देऊळ पठाणपूरा,अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम बाबूपेठ,राष्ट्रवादी नगर येथे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.सकाळी ५.३० ते ८.३० वाजे पर्यंत चालल्या या शिबाराला भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,महामंत्री कासंगोट्टूवार,महिला मोर्चा महामंत्री प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार,सपना नामपल्लीवार,महिला मोर्चा उपाध्यक्ष मंजुश्री कासंगोट्टूवार यांनी मॅरेथॉन भेट दिली.व नागरिकांशी संवाद साधला.
कोरोना नियमांचे पालन करीत सुरू असलेल्या या शिबिरांत योग प्रशिक्षण देणारे निळकंठ येरमे, बंडू पेंदाम, प्रतिभा पेंदाम, सुवर्णा लोखंडे, अरुणा शिरभैय्ये, रमेश ददगाळ मुरलीधर शिरभैय्ये, भोलाराम सोनुले, वृषाली धर्मपुरीवार, ज्योती राऊत,देवराव बोबडे,बबन अनमूलवार,रामराव धारणे,वंदना संतोषवार,प्रतिभा टेकाडे,अपर्णा चिढे,ज्योती आस्कर, नीता धामनगे,विजय चिताडे,रमेश येगीनवार,राजेश होकम,सौ दोनाडकर,सौ मंदे,राजेंद्र गुंडावार,श्रीकांत बच्चूवार,रवींद्र मांदाडे,प्रवीण नक्षीने,लता चापले,चितवन चव्हाण,नसरीन शेख,डॉ शैलेंद्र शुक्ला,प्रशांत तुंगीडवार,अनुप शर्मा,स्मिता श्रीगडिवार,प्रदीप लोखंडे,राहुल वांढरे,पूनम झा,महेश कानपल्लीवार,नन्नावरे,स्मिता रेभनकर,वंदना भूषणवार,ज्योती मसराम,नसरीन परवीन शेख,सनसर परवीन शेख,मिलिंद गंपावार,प्रतीक्षा धकाते,रुपाली मल्लेलवार,चंद्रशेखर गंनुरवार,रमेश कासुलकर,किशोर लुनावत, रमेश काकडे,रामभाऊ ढगे,माधुरी वाकडे,आनंद वनकर, हेमलता पटले,रंजना कोहळे,जयश्री जिवतोडे या योग शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या शिबिरांच्या आयोजनात पतंजली योग सेवा समिती,आर्ट ऑफ लिविंग,गायत्री शक्तीपीठ,श्री माता निर्मला देवी मंडळ,श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
शिबिराचे सहसंयोजक उपमहापौर राहुल पावडे यांचेसह संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,दिनकरराव सोमलकर,विठ्ठल डुकरे,संदीप आगलावे,प्रशांत विघ्नेश्वर,मनोज सिंघवी,धनराज कोवे,बंडू गौरकार,चंदन पाल, रामकुमार अकापेलिवार आदींनी सूक्ष्म नियोजन करीत योग शिबिर यशस्वी केले.
0 Comments