दारू विक्रेते व प्राशन करणार्‍यांकरिता ११ सूत्री मागण्या !



  • चंद्रपूरकरांची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक !
  • दारू सुरू करण्यापूर्वी राज्य शासन एवढी तरी दखल घेईल काय?

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी हटल्यायानंतर आता दुकाने कधी सुरू होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अद्यापपावेतो याबाबत कोणतीही तारीख निश्चित नसून परवान्यांचे नूतनीकरण व अन्य बाबींसाठी अवधी लागणार आहे असे बोलले जात असले तरी सुरू होत असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांवर काही निर्बंध लावण्यात यावे यासाठी विविध स्तरावरून मागण्या होऊ लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याकडे कोणत्या दृष्टीने बघतात हे आता येणारा काळच सांगेल?


चंद्रपूर : वर्तमान शासनाने चंद्रपूर जिल्हय़ाची दारूबंदी उठविल्याचे जाहीर केल्याने "कही खुशी कही गम" अश एकंदर असे वातावरण जिल्हय़ात असून दारू सुरू केल्याचे श्रेय घेणारे व आनंद साजरा करणारे विशेषत: दारू बंदितही दारू विक्री सुरू राहावी यात सहभागी असलेल्या मंडळींनी त्याकरिता बजावलेले कर्तव्य व दारूबंदी अपयशी कशी ठरली या मागील गमक यांच्या शोधात न पडता पूर्वी एका काळी कांॅग्रेस सरकारच्या वेळेस दारूबंदीचा अनुभव येथील नागरिकांनी घेतला आहे. आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि, दारू सुरू करणे किंवा बंद करणे हा अधिकार शासनाचा असला तरी चंद्रपूर जिल्हय़ाची दारू सुरू करण्यापूर्वी एवढी घाई न करता जनसामान्यांना अपेक्षित काही बाबी व त्यांच्या दृष्टीने वाईन बार व दारू भट्टयातील पूर्वीच्या त्रुट्या सर्वप्रथम दुर करून लोकहितातील नियम निकष कायम ठेवून परवाने नुतनीकरण करतांना खालील निकषाचे प्रामाणिकतेने अंमलबजावणी करण्यात यावी. या विषयाला अनुसरून चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा विकास व समस्या निवारण समितीने शासनास निवेदन प्राप्त करण्यात आले असून राज्यातील काही मान्यवर नेते मंडळीने यासोबतच गडचिरोली व वर्धा जिल्हा दारू युक्त करण्यासाठी जरी मागण्या रेटत असले तरी शासनाने दारू बाबत सुधारित धोरण आखावे असे नमूद करून खालील त्रुट्या पूर्ण झाल्याशिवाय दारू व्यवसाय सुरू करू नये.
मागण्यांचे निवेदन सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा विकास व समस्या निवारण समिती व यशवंत दाचेवार, अरविंद मुच्चुलवार, दशरथ आंबोदरकरजी, डॉ. मनोज खोब्रागडे, डॉ. एस. वाय. साखरकर, दिपक खाडीलकर, योगेश उपरे, शामराव उराडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

अशा आहेत मागण्या!

ज्या दारू परवानाधारकांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी दारूबंदी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दारू विक्रीस सहभाग घेतल्याचा गुन्हा दाखल असेल त्यांचे परवाने नुतनीकरण करण्यात येवू नये. ज्यांनी आपले परवाने स्थानांतरीत करून घेतले असेल त्यांना परत जिल्हयात स्थानांतरीत न करून देता त्यांच्या ऐवजी नविन पात्र व्यावसायिकांना परवाने देण्यात यावे. स्थगीत, रद्द किंवा प्रलंबित परवाने सुरू करण्यापुर्वी चंद्रपुर आरोग्य कल्याण निधीला प्रत्येक परवानाधारकांकडून मासिक ५ लाखांचा निधी देण्याचे बंधन टाकण्यात यावे. प्रत्येक वाईनबार व दारूमठीत स्वच्छतागृह व स्वच्छता तसेच सुव्यवस्थीत वेटींग रूम असावे तसेच दारू भट्टीवर विकल्या जाणारी दारू जर शासनास आवाक्यात आणता येत नसेल तर, तेथे शुद्ध पाणी व स्वच्छ ग्लासची व्यवस्था करावी. धार्मिक स्थळ व शिक्षण संस्था पासुन चारही बाजुने वाईनबार किंवा दारूभट्टीचे अंतर निकषाप्रमाणे बंधनकारक करण्यात यावे. दर गुरुवारी वाईनबार व दारूभट्टया बंद असाव्या तसेच नशा जास्त झालेल्या व्यक्तीशी अभद्र वागणूक न करता त्यास घरापयर्ंत पोहचता करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दयावे. चंद्रपूर जिल्हयाच्या दारू विक्रीतून येणारा ५0 टक्के उत्पादन व विक्री शुल्कातून जिल्हय़ाच्या शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्ती वर खर्ची करण्यात यावा. प्रत्येक दारू पिणार्‍यास दारू परवाने देण्यात यावे व त्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांची यकृत ईत्यादीवर व्यवस्थीत आहे की नाही याची तपासणी करण्यात यावी. दारू भट्टीतून देशि दारू घेणार्‍या केशरी कार्ड धारक, प्राधान्य कुटूंब कार्ड धारक व अंत्योदय कार्ड धारक यांची आर्थिक परिस्थिती व र्शम लक्षात घेता दरात २५ टक्के सुट देण्यात यावी. प्रत्येक दारू परवाना घेणार्‍यास १२ रुपयांचा अपघात विमा काढणे अनिवार्य करण्यात यावे. तसेच या जिलतील आदिवासींना हातभट्टीची दारू काढण्यासाठी परवानगी योग्य बंधनासह देण्यात यावी. दरमहा अचानक प्रत्येक वाईन बार व दारूभट्टीतील दारूचे नमुने भेसळ होवू नये याकरीता तपासण्यात यावे. शाकाहारी दारू पिणार्‍या मंडळीकरिता वाईनबारमध्ये शुद्ध शाकाहारी रेस्टारंटची व्यवस्था व्हावी. दारू परवानाधारक ज्याचा मृत्यू झाला हे जर दारूचा त्याच्या शरिरावर दुष्परिणाम झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना शासनाने अश्या केशरी कार्ड धारक किंवा अंत्योदय कार्डधारक व बि.पी.एल. कार्डधारकांना सानुग्राह मदत देण्यात यावी.

Post a Comment

0 Comments