चांद्याचं तपन... @48c. ( झाडीबोलीत )
गर्मी पायी लोकं येती
फोळून रायले टाहो...
या चांद्याचं राजेहो,
हे तपन हो का काहो....?

येतली सकार तं,
दुपारवानी असते...
दुपारचं तपन तं,
इस्त्यावानी लासते...

तपनान बईन येती,
पिगलून रायला मेंदू...
अस वाटते सुर्याले,
आता कवा कवा चेंदू...

कुलर बी बईन येती,
नाइ करत काम...
ढकं ढकं पाणी पेते,
निरा निंगते घाम...

तपनापाइ जीव कसा,
उलार वालार होते....
झाउ लागली कातं,
माणूस सुलार होते....

सुर्या कायले बे लेका,
असा आग उगलून रायला...
रोडावरचं डांबर बी,
लेका येती पिगलून रायला...

मुंबई पुण्याचे लोकं मंते,
भाऊ हे तपन कसं झेलू...
दोन दिसात गावकं जाते,
मंते हे तपन पावून भेलू...

येतले पोट्टे बी संगी,
भर तपनात खेलते...
पुऱ्या तपनाचा भार
विदर्भाचेच लोकं झेलते...

अस वाटते सुर्य विदर्भात,
मुक्कामालेच आला...
लावूल लगन विदर्भासंग,
येतला घरजावइ झाला....

✍अरूण घोरपडे, चंद्रपूर..
मो. 9657041041

Post a Comment

3 Comments