टेबल-खुर्च्या लावून जिल्ह्यात होत आहे अवैध दारूची विक्री!



  • "ना हाक ना बोंब" ग्राहकांना पुरविल्या जात आहेत सर्वच सुविधा!
  • कारवाई च्या नावाने बोंबाबोंब, कोण करणार कारवाई, आबकारी विभाग की स्थानिक पोलिस ?

चंद्रपूर (वि. प्रति.)
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविल्यानंतर ही मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे. कोणतीही भीती न बाळगता अवैध दारू विक्रेते आता खुले आम टेबल-खुर्च्या लावून जिल्ह्यात ग्राहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत, या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई मात्र "शुन्य" आहे. 

अवैध दारू विक्री सोबतच एक्सपायरी डेट ची दारूची सुद्धा विक्री?

जिल्ह्यात अवैध दारू विक्री सोबतच एक्सपायरी डेट च्या दारूची सुद्धा विक्री होत असल्याची घटना होळीच्या एक दोन दिवसापूर्वी गडचांदूर शहरात घडली होती. त्यासंदर्भात आबकारी विभागाकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील दारूबंदी म्हटल्यानंतर दारू बंदी विभाग हा संशयाच्या घेऱ्यात आला आहे, हे कार्यालय आता शोभेची वस्तू झाली आहे. कोरपना व राजुरा तालुक्यात अवैध दारू विक्री चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून खुलेआम या ठिकाणी होत असलेली दारू विक्री हा चिंतेचा विषय आहे. राजुरा शहरामध्ये आबकारी विभागाचे कार्यालय असून अवैध दारू विक्री वर व नियमबाह्य दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात तसेच एक्सपायरी डेट च्या दारूविक्री वर कारवाई करण्यात राजूरा दारूबंदी विभागातील अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही यातच खरी गोम दडली आहे. राजुरा पासून गडचांदूर शहरापर्यंत व गडचांदूर पासून कोरपना तालुक्यापर्यंत अनेक ठिकाणी कच्चे तंबू व टेबल-खुर्च्या लावून खुलेआम अवैध दारू विक्री होत असल्याचे वृत्तामध्ये प्रकाशित झालेले छायाचित्र हे गडचांदूर शहरातीलच आहे. एक्सापायरी डेट च्या दारूविक्री ची चौकशी व त्यावर कारवाई करण्यास राजुरा दारूबंदी विभाग व जिल्हा दारूबंदी विभाग कां बरे धजावत नाही? हा प्रश्न उभा राहतो.

महत्त्वाचे म्हणजे दारूबंदी पूर्वी पोलीस विभाग बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करीत होता. एखादीचं कारवाई दारूबंदी विभागाकडून होत होती. अवैध दारू विक्री वर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याची ओरड त्यावेळी करण्यात येत होती. जिल्ह्यात असलेल्या दारूबंदी विभागाला अवैध दारूविक्री वर कारवाई करण्याचा अधिकार आहे. जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर अनेक परवानाधारकांचे परवाने नूतनीकरण करण्यात आले. दारूबंदी असतांना जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा जिल्ह्यात होत होता, त्यामुळे करोडो रुपयांची दारू जिल्ह्यामध्ये दारूबंदी मध्ये पकडण्यात आली होती व हजारोच्या संख्येने अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अवैध दारू विक्रीमुळे अपराधी प्रवृत्तींची वाढ झाली असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल डुबत असल्याचे कारण समोर करीत व जिल्ह्यामध्ये दारूबंदी अयशस्वी झाली हे कारण समोर करीत राज्यकर्त्यांनी जिल्ह्यातील दारूबंदी हटविली. आत्ता मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारूविक्री वर लगाम कसण्यात प्रशासनाला व शासनाला काय अडचण येत आहे असा प्रश्न उभा राहतो. दारू बंदी हटल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्री वर आळा बसविण्यास राज्यकर्त्यांना व प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे. "कूंपणचं शेत खात आहे." असा हा प्रकार आहे. आता तर अवैध दारू विक्रेते जिल्ह्यात खुलेआम टेबल खुर्च्या लावून दारू शौकिनांना दारूचा पुरवठा करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्यास संबंधित विभाग कां बरे लाचार आहे? हा संशोधनाचा विषय आहे. दारूबंदी असतांना जिल्ह्याच्या बाहेरून जिल्ह्यामध्ये दारू आणल्या जात होती परंतु आता परवानाधारकचं या अवैध दारू विक्रेत्यांना दारूच्या पुरवठा करीत असून त्यांच्या छत्रछायेखाली जिल्ह्यात लेन-देनच्या माध्यमातून अवैध दारू विक्री बिनधास्त मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र आहे. कोणत्याही वाईन शॉप व बिअरशॉप मधून फक्त दारूची विक्री व्हायला हवी असा शासनाचा दंडक आहे. शौकिनांसाठी पिण्याची व्यवस्था ही वाईन शॉप मध्ये करणे म्हणजे नियमाचा भंग करणे आहे.

दुकानाच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची नागरिकांची मागणी!
जिल्ह्यात दारूबंदी म्हटल्यानंतर अव्वाच्या सव्वा दराने दारू विक्री होत आहे, अशी ओरड दारू शौकीनांकडून होऊ लागली आहे. मनमानी दराने. होणारी दारूच्या विक्री वर निर्बंध लावण्यासाठी प्रत्येक दारू दुकानांच्या दर्शनी भागात त्या ठिकाणी विक्री होणाऱ्या दारूचे दरपत्रक लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments