जागतिक हवामान दिवस २३ मार्च निमिताने पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा सुरेश चोपणे वाचा यांनी दिलेली माहिती...!
चंद्रपूर मध्ये उष्ण लहरी कमी मात्र पावसाळा, अति पाऊस वाढणार!
सेंटर फॉर सायन्स टेक्नोलॉजी अंड पोलीसी या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा अभ्यास करून धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील ३० वर्षाच्या तुलनेत २०२१-२०५० या काळात १ ते २ अंश सेल्सिअस ने वाढणार असून पाऊस आणि अति पावसाचे दिवस आणि प्रमाण वाढणार असल्याचे पूर्वानुमान काढले आहे. चंद्रपूर मध्ये आनंदाची बाब म्हणजे येथील उच्च तापमान आणि उष्ण लहरींच्या संख्येत घट होणार असल्याचे अनुमान काढले आहे. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामावर होणार अशी माहिती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
बंगलोर आणि नोयडा येथील सेंटर फॉर सायन्स टेक्नालोजी अंड पॉलोसी या संस्थेने महाराष्ट्रातील • सर्व जिल्ह्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आणि IPCC आकडेवारीवरून १९९० ते २०१९ या मागील ३० वर्षाच्या तुलनेत भविष्यातील २०२१ २०५० हया वर्षात वायू प्रदुषनाची मध्यम आणि जास्त वाढ झाल्यास हवामानावर किती परिणाम होईल यावरून महाराष्ट्रातील हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाची (IMD), IPCCची ● आकडेवारी आणि CORDEX मोडेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्हानिहाय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधीच हवामान जोखीम निर्देशांकात भारत ७ व्या क्रमांकावर आणि नैसर्गिक आपती निर्देशांकात ३ रा आहे, त्यामुळे हा अहवाल अतिशय धोक्याची सुचना देतो आहे.
अभ्यासानुसार चंद्रपूरच्या तापमानाची स्थिती महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हयाचा अभ्यास केला असता मागील अनेक वर्षाच्या तुलनेत चंद्रपूर मध्ये उष्ण लहरीच्या घटनात वाढ झाली आहे, परंतु आनंदाची बाब म्हणजे २०२१ ते २०५० दरम्यान चंद्रपूर येथे उष्ण लहरीचे दिवस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे परंतु अत्याधिक तीव्रतेच्या उष्ण लहरी वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या अभ्यासातून वर्तविली आहे. चंद्रपूरचे सरासरी तापमान इतर जिल्हयाच्या तुलनेत सुरवातीच्या वर्षात वाढत्या वायू प्रदुषणाच्या संदर्भाने कमी म्हणजे ०.८ डिग्री असेल तर पुढील टप्प्यात १.२ डिग्री वाढेल. हिवाळ्यातील तापमान सुद्धा १.५ ते २.४ डिग्रीने वाढेल असा अंदाज या अभ्यासातून वर्तविण्यात आला आहे.
चंद्रपूर मध्ये पावूस आणि अति पावूस वाढणार- २०२१-२०५० च्या वाढत्या प्रदूषणानुसार चंद्रपुरात पावसाचे ७ दिवस वाढनार आहे. परंतु दुसऱ्या टप्यात पावसाचे दिवस कमी होऊन ६ दिवस होणार आहे. खरीप हंगामात सुरवातीच्या वर्षात ८ % तर नंतरच्या वर्षात १७% वापसाचे प्रमाण वाढेल. परंतु रब्बी हंगामात हे प्रमाण सुरवातीच्या वर्षात १०% तर नंतरच्या वर्षात २०% वाढेल. चंद्रपूर मध्ये सुरवातीच्या काळात अति पावसाच्या घटना २ घटना आणि नंतरच्या काळात दरवर्षी ३ घटना घडणार. पुढील काळात ढगफुटी सारख्या १ ते २ घटना घडणार आहेत.
(संपूर्ण अहवाल वाचा)
0 टिप्पण्या