बिनबा गेट परिसर खड्डेमुक्त करण्याची नागरिकांची मागणी !
चंद्रपूर :- स्थानिक बिनबा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात वस्तू असून बिनबा गेटच्या आतील व बाहेरील परिसरात जागो जागी खड्डे पडले असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर परिसर खड्डेमुक्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी मनपा उपमहापौर राहुल पावडे व मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.
या भागात शाळा, कॉन्व्हेंट, विद्यालये व ट्रान्स्पोर्ट उद्योग आहे. शिवाय शांतीधाम स्मशानभूमी देखील आहे. त्यामुळे स्थानिक भागात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. परिसरात दुचाकी, चारचाकी वाहनांसह ओव्हरलोड वाहतूकही सुरू असते. परंतु, रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून परिसरातून ये-जा करावी लागत आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय पुढे पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे गेटच्या आतील व बाहेर असलेल्या परिसरातील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी चाद सैय्यद सचिन बोबडे राजेश घटे शुभम घटे संजय चहारे श्रीकांत घटे यांनी केली आहे.
0 Comments