जिरली




🌷🌷🌷जिरली 🌷🌷🌷
**********************


हा म्हणे त्याची जिरली
तो म्हणे ह्याची जिरली !!
एकमेकांच्या जिरवा जिरवित
दोघांची ही चांगलीच जिरली !!१!!

       राजकारणाच्या सारीपाटावर
       हबाब मे नंगे सारेच आहे !!
       इमानदारीचा हव्यास सा-यांना
       पण बेईमान सारेच आहे !!२!!

मी नाही तशी म्हणून
जगात डिंडोरा पिटायचा !!
शरदाच्या चांदण्यात गुपचूप
विवाह उरकून घ्यायचा !!३!!

      बोलतो एक अन् करतो एक
      विश्वास कसा ठेवायचा !!
      मंगळसूत्र एका चे घालून
      हनिमूनला दुसराच न्यायचा !!४!!

कमळ चिखलात फसले
धनुष्याचा दोर तुटला !!
घड्याळाचा काटा मोडून
बोटांच्या पंजात घुसला !!५!!

-रमेश कृष्णराव भोयर,
भद्रावती

Post a Comment

1 Comments