शिवरायांच्या जयंती निमित्य वरोरा शहरात मनसेच्या १० शाखांचे थाटात उद्घाटन !#रजुकुकदे  • वरोरा तालुक्यात मनसेचा वाढलाय जोर. गाव तिथे शाखा अभियानात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वरोरा (प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन वाढविण्याचा मंत्र देऊन शाखा बांधणी करण्याचे आवाहन केले होते. कुठलाही पक्ष किंव्हा संघटना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहत असते त्यामुळे जर पक्ष संघटन असेल तर राजकीय सत्ता हस्तगत करणे सहज शक्य होते त्याचाच धागा पकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसे नेते रमेश राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या विशेष प्रयत्नाने गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वरोरा ग्रामीण भागात पक्षाच्या शाखा बांधणी सुरू असताना आता शहारात सुद्धा एकाच दिवशी १० शाखांचे उद्घाटन शिवछत्रपतींच्या जयंती निमित्याने केल्याने वरोरा तालुक्यात मनसेचा जोर वाढला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी सुरू असताना शिवछत्रपतींच्या जयंती निमित्याने वरोरा शहारातील आनंदवन चौक, मालवीय वार्ड, खांजी वार्ड, स्टेडियम चौक, सलीम नगर, दत्त मंदिर वार्ड, महात्मा फुले वार्ड, शिवाजी वार्ड, वणी नाका चौक व सिद्दार्थ वार्ड येथे अनुक्रमे शाखांचे उद्घाटन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. शहरातील आनंदवन चौकातील शाखा उद्घाटन केल्यानंतर अंतिम १० व्या शाखाचे उद्घाटन वणी नाका चौक येथे करण्यात आले, यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.

या शाखा बांधणीसाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, मनसे चे जगदीश लांडगे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर, दिलीप उमाटे, कुलदिप निमकर, कुणाल गौरकार, तालुका सचिव कल्पक ढोरे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, महाराष्ट्र सैनिक विजय खारकर इत्यादींनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments