मी झाडीबोलीचा वारकरी !


*झाडीतली बातचित....शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 ला मुलं तालुक्यातील जुनासुर्ला येथे आयोजित झाडीपट्टी साहित्य संमेलनानिमीत्त  सुखदेव चौथाले,  यांचा लेख वाचकांसाठी...!*

मी झाडीबोलीच्या भपरवासात माजा "वैनगंगेचा पाणी" पुस्तक लीवलुतवापासुन जुडलु. माले पयलं झाडीबोली भाषा बोलावाले लाज वाटाची, जवा मी 1978 मंदी चांद्याले शिकाले गेलु तवा आमाला शयरातले पोरं आमच्या भाषेला नावंबोटं ठेवत, तवा आमी शुद्ध भाषा बोलाचा परयतन केलु. व जवापासुन 2009 पासुन मी वारक- यासारका झाडीबोलीच्या संमेलनाले जावाले लागलु तवा पासुन माले झाडीच्या बोलीचा आणिक लडा लागला, आमच्या डाॅ. हरीश्चंद्र बोरकर, यांनी सप्पाजण झाडपायले 1992 पासुन झाडीबोलीचा संमेलन सुरु करुन चराटासारखा बैलाले कसा सडपवते तसासप्पाजणाले एका ठिकाणी मूठ बांदुन एक
एक कवी,लेखक, याईले झाडीचा परशिक्षण देवाले सुरु केलनं, तवा कोटी आमाले बुद आली, वरो-याचा थुटे गुरुजी, नागभीडचा जयस्वाल गुरुजी, चांद्याचा बंडोपंत बोढेकर, नागपुरचा हिरामण लांजे, वडेगांवची अंजनाबाई खुणे, सीराम खुणे, आरमोरीचे नाटककार, वडपल्लीवर गुरुजींना, आमदार, हेमकृषण कापगते, एक हजार कवी लेखक, यायची मोटी 29 वर्षाची झाडीबोलीचा वजा वाहात, वाहत, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली,  गोंदिया  या चारही जिल्यात  दरवरसी लोकाईच्य
सहभागातुन संमेलन  घेत घेत चंद्रपुर जिलयाचाया मूल तालुक्याच्या " जुनासुर्ला " या
वैनगंगेच्या काठावर,  शेतीवाडींनी, डोंगरानी , चारी  बाजूंनी हिरव्यागार झाडीच्या  नयनरमणीय भागात होत आहे.सप्पाजण  झाडीवाल्या लेखक, कवि, भाष्यकार, मंतरी सायेब, गावांतील बाया-बापुडे परमुक पाऊणे, शेतकरी, कामकरी, शिक्षक, शाळाईचे पोरंबारः याईले आनंद देणारे झाडीबोलीचे संमेलनाले शुबेच्छा देऊ या!

 !! जय झाडी !!
 
शब्दसाधक:- सुखदेव चौथाले, 
मुल जि.चंद्रपुर. 
,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या