२९ व्या झाडी बोली साहित्य संमेलनात ठरावावर गांभीर्याने विचार व्हावा !




चंद्रपूर : जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर येथील दि. १२ व १३ मार्च रोजी आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनात रसिकांनी आपली भरगच्च उपस्थिती दर्शविली. झाडी बोली जिवंत रहावी, यासाठी प्रयत्नशिल असलेले झाडीपट्टी चे अमिताभ बच्चन डॉ. हरिश्चंद्र बोरकर वयाच्या 76 व्या वर्षीही या कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित होते.दोन दिवस मुलं तालुक्यातील जुनासुर्ला येथे आयोजित केलेल्या या झाडी बोली साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी चार ठराव मांडण्यात आले. या ठरावावर झाडीपट्टीतील शासनकर्त्यांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
१) गोंदिया येथे होवू घातलेल्या विमानतळाला भवभूती विमानतळ असे नाव देण्यात यावे., (२) नियमित वार्षिक साहित्य संमेलन घेणाऱ्या महाराष्ट्रातील ठराविक संस्थांना विभागीय संस्थांप्रमाणे संमेलनांसाठी नियमित अनुदान देण्यात यावे., 3) झाडीपट्टीतील सांस्कृतिक वारसा असलेल्या पुरातन पाषाण शिल्पांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी पुरातत्व विभागाने घ्यावी., ४) शालेय अभ्यासक्रमात इतर भाषांप्रमाणेच स्थानिक आदिवासी भाषा व बोलीभाषा यांचा अभ्यासक्रम संयुक्त अभ्यासक्रमाच्या पद्धतीने सुरू करण्यात यावा., ५) गोंदिया-चांदा रेल्वेस्थानकास (BNR) झाडीपट्टी एक्स्प्रेस हे नांव देण्यात यावे. असा ठराव झाडी बोली साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी घेण्यात आला., या ठरावावर झाडीपट्टीतील शासनकर्त्यांनी गांभीर्याने विचार करूण मंजुरी मिळविण्याची आवश्यकता आहे.

इतवारचा खाजा....!

मन बावरला.....
मन बावरला देकून दंग,
मनात भरला सावरा रंग....१
टुकुर टुकुर नंजरेचा वार,
कारजात घुसला आरपार....२
झोप पराली खुल्या पापन्या,
रूप डोऱ्यात तिच्या जोगन्या.....३
भोवती तिच्या फिरला डोरा,
भुलल्या अनकी किती नंजरा.....४
झिमूर पानी मातील् गंद,
तुझ्या इसकात चिंबून धुंद....५
पुना येकदा पायजो भिंग,
इकरल् केसा वाकडा भांग.....६
कितिई सवार झाक तू आंग,
तुझ्या निसेचा पिलू मी भांग....७
-मुरलीधर.ई. खोटेले

Post a Comment

0 Comments