दारू दूकानाच्या वितरणात नियम धाब्यावर बसविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा !




दारू दुकानांचे स्थानांतरण व मंजुरी वादाच्या भोवऱ्यात, भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जनविकास सेनेचे पप्पु देशमुख यांची मागणी ! 

चंद्रपूर (वि.प्रति.): धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था, रुग्णालयाजवळ निवासी वस्तीत देशी दारु दुकानाचे स्थालांतरण, बियर शॉपी, वाईन शॉपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम धाब्यावर बसवून मंजूरी दिली. पोलिसांनी सुद्धा डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला. अन् जिल्हा प्रशासनाने या स्थानांतराला, दुकान वाटपाला मंजुरी दिली. मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला घेणे नियमानुसार आवश्यक आहे.परंतु सर्वच प्रकरणात असा दाखला घेण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले. त्यामुळे सर्वच दारू दुकानांचे स्थानांतरण व मंजुरी आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पप्पु देशमुख यांनी मागणी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या मेहेरबानीने आर्थिक देवाणघेवाणीतून स्थानांतरणाला परवानगी देत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नियम डावलून वाटप केलेल्या दारू दुकानाविरोधात बुधवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची शासनस्तरावर पुराव्यानिशी तक्रार करून निलंबनाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धार्मिक स्थळाबाबत अहवालात लपवणूक!
दाताळा रोडवरील देशी दारु दुकानाच्या उत्तरेकडून रस्ता असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात दाखविले आहे. मुळात दुकानाच्या उत्तर व दक्षिणेकडे खासगी प्लॉट आहेत. पश्चिमेकडील प्रस्तावित रस्त्याची मंजूरी वादात सापडली आहे. हाकेच्या अंतरावर जगन्नाथबाबा मठ, चर्च, बालाजी मंदिर व हनुमान मंदिर असल्याची बाब जाणीवपूर्वक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात लपविण्यात आली. नागपूर रोडवरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित देशी दारू दुकाला लागून नोंदणीकृत बाल रुग्णालय तसेच दत्त मंदिर, प्राथमिक शाळा असल्याची बाब राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाचा अहवालामध्ये दडपण्यात आली आहे.

प्रवेशद्वार बंद करण्याचा सल्ला!
केडी कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशात उत्तर-दक्षिण दोन्हीकडे प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारापासून २५ ते ३० मीटर अंतरावर डॉ. कोलते यांच्या दवाखान्यामागे नागदेवतेचे नोंदणीकृत मंदिर आहे. या मंदिरामुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून दक्षिणेकडील मंजूर नकाशातील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्याचा सल्ला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकार्‍यांनी दुकानदाराला दिला. देशी दारू दुकानाच्या समोर संरक्षित श्रेणीतील शंभर वर्षे जुने पवित्र वडाचे झाड आहे. अहवालामध्ये हेतूपुरस्पर वडाचे झाड व टायपिंग इन्स्टिट्यूट बाब लपवली आहे.

जैन मंदीराला लागूनच बिअर व वाईन शॉपला मंजूरी!
सराफा बाजारामध्ये असलेल्या जैन मंदिराला लागून काळे यांचे फटाक्याचे दुकान होते. या दुकानांमध्ये आता बिअर शॉपी व वाईन शॉप सुरू होणार असल्याने जैन मंदिरात येणारे भाविक व परिसरातील सराफा व्यावसायिक संतापलेले आहेत. जैन मंदिराला लागून बिअर शॉपी किंवा वाईन शॉपीला राज्य उत्पादन शुल्क विभाग,पोलीस विभाग किंवा जिल्हा प्रशासन कशी काय मंजुरी देऊ शकते ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे, असे एका पत्रकान्वये अमोल घोडमारे यांनी कळविले आहे.


जिल्ह्यातील दारू दुकानांच्या आलेल्या तक्रारींची चौकशी व त्यावर कारवाई करावी अशी सुरवातीपासून पत्रकार संघाची होती मागणी !

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटल्यानंतर शासनाने दिलेल्या दिशानिर्देश आला राज्य उत्पादन शुल्क विभागाने यांच्या माध्यमातून केराची टोपली दाखवली होती. गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसापासून शेंद्रे यांच्या दारू दुकानासमोर ग्राहकाला झालेली अमानुष मारझोड, शेंद्रे यांचे दारू दुकानाच्या तक्रारी, शासनाने ठरवून दिलेल्या दराब दरापेक्षा जास्त दराने होत असलेली दारूची विक्री, गडचांदूर शहरात नुकतेच नगरपरिषद ऐका कॉम्प्लेक्समध्ये सूरू झालेल्या बियर शॉपी इत्यादी प्रकरणावर साप्ता. विदर्भ आठवडी ने वृत्त प्रकाशित करून उजेड टाकला व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी यासंदर्भात पत्रकार संघाच्या माध्यमातून निवेदनही दिली पण त्या सर्व निवेदन ना राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने केराची टोपली दाखवली. पत्रकार संघाने केलेल्या तक्रारीची व विदर्भ आठवडीच्या वृत्ताची दखल घेईल. व तक्रारी झालेल्या संपूर्ण प्रकरणाची प्रामाणिकपणाने चौकशी करावी, अशी पत्रकार संघ मागणी करीत आहे.

Post a Comment

0 Comments