जाणाऱ्यांनी काय ठेवले जाता जाता
सोबत त्यांनी काय घेतले जाता जाता
खांद्यावरती नेले जेंव्हा वाजत गाजत
सांगा त्यांना कसे सजवले जाता जाता
बाजूचे पण पाहत होते दुरून जेंव्हा
वाद्या सोबत किती नाचले जाता जाता
आवाजाने छाती धडकत होती माझी
सांगा कसले नियम पाळले जाता जाता
स्वागत माझे करण्या साठी आले सारे साऱ्यांनी मग फुल टाकले जाता जाता
स्मशानातली शांतता मला हळू म्हणाली
कल्लोळ नको प्रेत पेटले जाता जाता
आठवणीने उरात माझ्या दाटत आले
नयनातूनी अश्रू गळले जाता जाता
विजय भगत
0 Comments