कोणतीही भीती न बाळगता खेळाडूंनी कोंबड बाजारात येणाऱ्यांना केले व्हाट्सअप वर आवाहन !
भ्रष्ट राजुरा पोलीसांच्या आशिर्वादाने सर्रास होतोय लाखोची उलाढाल ?
चंद्रपूर ( वि.प्रति.) ; राजुरा तालुक्यातील चूनाळा-हरिगंगा-बामणवाडा येथील रेल्वे गलात आज शुक्रवार दिनांक १३ मे रोजी मोठ्या प्रमाणात कोंबड बाजार भरविण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे काही कोंबड शौकिनांच्या व्हाट्सअप ग्रुप वर "एक दिवसीय कोंबडे बाजार मौजा-राजूरा-चुनाळा बामनवाडा-चूनाळा या मार्गावर रेल्वे पटरी आहे, त्याठिकाणी पडीत क्वार्टर मधील हा कोंबड बाजार आयोजीत करण्यात येतो. याकरिता सर्व कोंबड बाजार खेळाडूनी मनात कोणतेही भीती न बाळगता येण्याचे करावे...धन्यवाद*" असा मॅसेज विठ्ठल पाल,दीपक फुले व त्यांचे सहकारी यांनी व्हायरल करून राजुरा पोलिसांच्या नाकावर नींबू पिळून हा कोंबड बाजार भरविल्यामुळे राजुरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल पाल यांचा तामिळनाडू येथून लढाऊ कोंबडे आणण्याचा व तो विक्री करण्याचा व्यवसाय आहे, त्यांच परिसरातील काही गैर प्रवृत्तींना सोबत घेऊन व पोलिसांची हातमिळवणी करून हा कोंबड बाजार भरविला व त्याची सोशल माध्यमांच्या माध्यमातून जाहिरात करणे म्हणजे राजूरा पोलिसांचा एकंदर कारभार किती भ्रष्ट आहे, हे सिद्ध करणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंधरा दिवसापूर्वी अशाच पद्धतीने कोंबडबाजार भरविण्यात आला होता व त्याची सोशल माध्यमावर बिनधास्तपणे जाहिरात करण्यात आली होती. पंधरा दिवसापूर्वी भरलेल्या कोंबड बाजाराचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रण करून तेरा मे रोजी भरलेल्या कोंबडबाजारात येण्यासाठी कोंबड शौकिनांना आकर्षित करण्यात आल्यामुळे याठिकाणी कोंबडबाजारात येण्यास कोणतीच भिती न बाळगता येण्याच्या केलेल्या आवाहनामुळे तेरा मे रोजी भरलेल्या कोंबडबाजारात येण्यासाठी कोंबड शौकिनांना आकर्षित भरविण्यात आलेल्या कोंबडबाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा सांगण्यात येत आहे. रोजी भरलेल्या कोंबडबाजारात येण्यासाठी कोंबड शौकिनांना आकर्षित करून भरविण्यात आलेल्या कोंबडबाजारात मूल, चंद्रपुर, गडचांदुर, पोंभुर्णा सह परराज्यातील शौकीनांनी आपली हजेरी ला्वल्याचे सांगण्यात येत आहे. याचेही विडिओ चित्रण करून ते सुद्धा सोशल माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजुरा पोलिसांनी यासाठी परवानगी दिली असल्याचे कळते. तर राजुरा पोलिसांकडून असा कोणताच कोंबड बाजार राजूरा पो. स्टे अंतर्गत होत नाही असे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी. अशी मागणी होत आहे. १३ मे रोजी भरविण्यात आलेल्या कोंबड बाजाराचे विडिओ चित्रण प्राप्त होताच राजुरा पोलिसांचे पितळ उघड होईल. परंतु वृत्तातील मेसेज व विडिओ चित्रण याची योग्य ती चौकशी व्हायला हवी.
मागील आठवड्यामध्ये चंद्रपूरची अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशन हद्दीत वरूर रोड सोशल युथ क्लब च्या नावाने भरणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्वतः धाड टाकून 85 जुगाऱ्यांना अटक केली होती, व सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. चंद्रपूर जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना याची माहिती मिळते तर चूनाळा येथे सोशल माध्यमांवर शौकीनांना आवाहन करून कोंबड बाजार भरविला जातो, याची माहिती राजूरा पोलिसांना कशी मिळाली नाही, यांचा तपास करून दोषींवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात यावी व दोषीं पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
0 Comments