झाडीबोलीतली गझल रचना !लुंगीवानी चोल्ना नेस्लू धोतर समजू नोका !
ढोलंढालं आंग्डा घातलु जोकर समजू नोका !!

गावामदला बुज्रुक मानोस सांगेल तसा वाग्तो !
मानापाई कामं करतो नोकर समजू नोका !!

कोटीही टाक पुरुन उरतो आहो मी झाडीचा !
डोहामधली कारी कनास घोगर समजू नोका !!

तपनं राहो, पानी येहो, दवबिन लागो काई !
वंडिव वासा हो खैराचा पोकर समजू नोका !!

सकारपासुन घाम गारून करतो कामं सारी!
खाउन पेउन आंग वाडला ठोकर समजू नोका !!

बैल वासरं, सेऱ्या मेंड्या, खोट्यामंदी बांतो !
शेनखत मनुन कामी येते गोभर समजू नोका !!

लावालाव्या, झगडे भांडन, करतच नाई काई!
ईचक धंदे करतो भाऊ लोपर समजू नोका !!


अरूण झगडकर, गोंडपिपरी

शब्दार्थ :- (चोल्ना - पँट / नेस्लू - नेसणे / ढोलंढालं - सैल
आंग्डा - शर्ट / घातलू -परिधान केले / बुज्रुक - वयोवृध्द व्यक्ती / कनास,घोगर - माशांचे प्रकार / दवबिन - थंडी वगैरे / वंडिव- भरीव / आंग - अंग / खोट्यामंदी - गुरांच्या गोठ्यात )

Post a Comment

2 Comments

  1. सन्माननीय राजूभाऊ बित्तुवार सर आपण माझ्या रचनेची दखल घेऊन विदर्भ आठवडी साप्ताहिकामध्ये प्रकाशित केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद..

    ReplyDelete
  2. आमच्या झाडीची शान आहेत अरुण सर , वाह👌👌💐

    ReplyDelete