Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

१३ मे रोजी भरलेल्या कोंबड बाजारात विठ्ठल पाल यांचाच तोरा !


पुन्हा भरणाऱ्या कोंबड बाजारासाठी फोटो व व्हिडीओ व्हायरल!

पडद्यामागील सूत्रधारांना राजुरा पोलिसांचा आशिर्वाद !

सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघितले वृत्त, काय दखल घेतल्या जाते याकडे साऱ्यांचे लक्ष !
पोलिस अधिक्षकांकडे करणार राजुऱ्याच्या अवैध व्यवसायाच्या चौकशी व कारवाई ची मागणी !

चंद्रपूर (वि.प्रति.) : "राजुरा पोलिसांच्या आशीर्वादाने कोंबड बाजार व कोळसा तस्करी जोमात!" या मथळ्याखाली साप्ता. विदर्भ आठवडी ने 14 मे रोजी छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये कोंबड बाजार व कोळसा तस्करांना पोलिसांकडून परवानगी? अशा आशयाच्या मथळा टाकण्यात आला होता, सदर वृत्ताच्या सत्यतेबाबत राजुरा पोलीस स्टेशनचे कोंबडबाजार चालणाऱ्या क्षेत्रातील बीट अंमलदार, अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची सदर अवैध धंद्याच्या सत्यतेबाबत पडताळणी करावी यासंबंधात बोलणे केले असता असा कोणताही अवैध व्यवसाय राजुरा पोस्ट अंतर्गत सुरू नसल्याची माहिती भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी दिली.

शुक्रवार दिनांक 13 मे रोजी असल्या प्रकारच्या कोंबड बाजार मोठ्या प्रमाणात भरविण्यात आल्याचे सांगितल्यानंतर व पुरावे सादर केल्यानंतरही अशा घटना घडतच नाही ही असे ठामपणे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर साप्ताहिक विदर्भ आठवडीच्या चमूने 13 मे रोजी राजुरा बामनवाडा चुनाळा मार्गावरील नाका नं.३, रेल्वे‌क्रासिंग जवळील पडक्या क्वार्टर मध्ये भरलेला कोंबड बाजार याविषयी छायाचित्रण केले असता स्वतःला कोंबड्याच्या विक्रेता म्हणणारा विठ्ठल पाल‌ याचा "तोरा" बघून व त्यामागील घडामोडी बघता या कोंबडं बाजाराचा राजुरा येथे वास्तव्यास असलेला पडद्यामागील म्होरक्या पोलिसापासून लपला नसुन‌ तोच या कोंबडं बाजाराचे सुत्र पोलिसांच्या सहमतीने हलवित असल्याची माहिती आहे.

"मी नाही त्यातली, कडी लावा आतली" अशी भुमिका राजुरा पो. स्टे. अंतर्गत सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे साप्ताहिक विदर्भ आठवडीने लावलेल्या वृत्ताला चंद्रपूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राजुरा चे उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार व राजुरा चे पोलीस निरीक्षक बहादुरे यांनी हे वृत्त बघितले असून त्यावर काय दखल घेतल्या जाते, हे बघणे आता गरजेचे आहे.


चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तहसील सध्या गुन्हेगारांची हब बनली आहे. राजुरा शहरातील गडचांदूर मार्गावर कोळशाचा मोठा व्यापार, अवैध तंबाखू व्यवसाय याला "परवानगी" देण्यात आल्या असून राजुरा पोलिसांना कोळशाच्या तस्करी सहभागी असणाऱ्यांकडून त्यांचा "वाटा" मिळत असून किती व कोणत्या कोळसा तस्करांना, तंबाखू व्यावसायिकांना "परवानगी" देण्यात आली आहे, त्याचा कारभार आता लपून राहिला नसुन हा सर्व कारभार बघणारा पोलिसांचा "विश्वासु" कोण? कुणाला कशाच्या परवानग्या देण्यात आल्या यासंबंधात लवकरच पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यानिशी तक्रारी करण्यात येणार असून वरिष्ठ प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष द्यावे व पोलिसांची मलिन प्रतिमा उंचावण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा, ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. तसेच राजुरा बामनवाडा चुनाळा मार्गावरील नाका नं.३, रेल्वे‌क्रासिंग जवळील पडक्या क्वार्टर मध्ये भरणाऱ्या कोंबड बाजाराची चौकशी करून "म्होरक्या" ला ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments