संस्थाचालक हितेश चव्हाण अपघातात बाल-बाल बचावले!अपघातग्रस्त वाहन व इन्सेट मध्ये अपघातात बचावलेले हितेश चव्हाण.
_------------------------------

चारचाकी वाहनाच्या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी!
गडचांदूर (प्रति.) : गडचांदूर शहरातील रहिवासी संस्थाचालक हितेश चव्हाण हे संस्थेच्या एका कामानिमित्त शहराबाहेर जात असतांना कोठारी नजिक हा अपघात झाल्याचे कळते. या अपघातातात संस्थाचालक हितेश चव्हाण हे बाल बाल बचावले असून वाहन चालक पवन‌ मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 17 रोजी संस्था चालक हितेश चव्हाण हे आपल्या संस्थेच्या कामानिमित्त बामणी पळसगाव येथे आपल्या वाहन चालका स्वतःच्या चारचाकी वाहन मारोती सुझुकी वियाज गाडी क्र. 5757 जात असतांना सायंकाळी त्यांच्या चारचाकीला कोठारी नजिक एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे कळते. हा अपघात इतका गंभीर होता की मोठी दुर्घटना होता होता टळली. हितेश चव्हाण दुर्गम भागामध्ये संस्था चालवत असून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, गोरगरिबांना शासकीय योजनांची माहिती देणे, गोरगरिबांना शासकीय योजनांचा पुर्ण लाभ मिळवून देणाऱ्या त्यांच्या संस्थेने व संस्थाचालक हितेश चव्हाण यांनी अल्पावधीतच या क्षेत्रामध्ये आपली वेगळी प्रतिभा निर्माण केली आहे. अपघातामध्ये हितेश चव्हाण हे बाल-बाल बचावले आहे. आजही ते पळसगांव बामणी येथील तेथील लाभार्थ्यांची माहिती घ्यायला गेले असतांना परत येताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments