पुढील आदेशापावेतो "रेती” चा उपसा बंद ! The next order is to stop the pumping of "sand"!


उपसा केल्यास होईल महसुल अधिनियम कायद्यातंर्गत कारवाई-खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम

Action will be taken under the Revenue Act-Mining Officer Suresh Naitam

चंद्रपूर (वि. प्रति . ) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ४० रेती घाटांचा लिलाव झाला होता. लिलाव झालेल्या या रेती घाटांवरून आज बुधवार दि. १ मार्च पासुन खनिकर्म अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपसा बंद करण्यात आला आहे. पर्यावरण अनुमती प्राप्त होईपर्यंत घाटातुन वाळुचे उत्खनन रद्द करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील ४० घाटांना १० जुन २०२३ पर्यंत उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती तसेच साठवणुक आणि विक्री करण्याचा करारनामा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत घाटधाकरांनी करण्यात आला आहे. या वाळुघाटांची पर्यावरण मान्यता २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत देण्यात आली होती, यासंदर्भात त्याला मुदत देण्यासंबंधात कार्यवाही सुरू असल्यामुळे रेती घाटातील पुढील उपसा बंद करण्यात आला आहे.


उपसा केल्यास होईल महसुल अधिनियम कायद्यातंर्गत कारवाई-
खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम

पर्यावरण अनुमती प्राप्त होईपर्यंत रेती घाटातुन वाळुचे उत्खनन करण्यात आल्यास त्यांचेवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-१९६६ चे कलम ४८ (७) (८) अन्वये दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचवेळी साठवणुकीच्या ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या परिमाणा एवढी वाळुची विक्री करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी यासंदर्भात दिली.

अवश्य वाचा.👉👉 पुन्हा एकदा जिल्ह्यात रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर !

नियमांना डावलुन होत होते रेती चे उत्खनन !

रेती उत्खननासंबंधात शासनाचे कायदे कडक आहेत. घाटातुन रेतीचे उत्खनन करतांना ते मॅन्युअली करावे असे स्पष्ट आदेश आहेत, परंतु जिल्ह्यात मनमानी पद्धतीने रेतीचा उपसा करण्यात येत होता. रेतीच्या उपस्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांची अवस्था बिकट झालेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याकडे रेती तस्कर व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली डोळेझाक शोचनिय बाब आहे. करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाई ला रेती व्यावसायिक जुमानत नाही. त्यामुळे अवैध रेती उत्खननाच्या अनेक वाहनांवर महसुल विभागाने कारवाई केली आहे.

अवश्य वाचा.👉👉

रेतीचा व्यवसाय ' हपापा' चा माल 'गपापा' !

रेती चे ठिक पण मुरूम, गिट्टी उत्खननावर नाममात्र कारवाया !

चंद्रपूर जिल्ह्यात रेती सोबतचं गौण खनिज उपलब्ध आहेत यामध्ये मुरूम, गिट्टी यासारख्या गौण खनिजांच्या उत्खननांकडे प्रशासनाने मात्र डोळेझाक केली असल्याचे दिसते. गिट्टी, मुरूम यासारख्या गौण खनिजांच्या उत्खननावर नाममात्र कारवाया करण्यात आलेल्या आहेत. यासंबंधात अधिक माहिती काढली असल्यास ५०० ब्रास पर्यंत गौण खनिजाच्या उत्खननासाठी तालुका स्तरावर परवानगी मिळत असते. उत्खननासाठी परवानगी देणाऱ्या विभागाने मंजुर केलेल्या प्रमाणात उत्खनन होत आहे की नाही याची पाहणी व कारवाई करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर त्या-त्या विभागाची आहे. संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी याकडे 'आर्थिक' देवाण-घेवाणीतुन दुर्लक्ष करीत आहे. याकडे ही जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी आपले लक्ष वेधावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अवश्य वाचा.👉👉पु न्हा एकदा जिल्ह्यात रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर !

तहसिल कार्यालयात रेती तस्करीत अडकलेल्या वाहनांसाठी जागा अपुरी !

चंद्रपूर चे कर्तव्यदक्ष एसडीएम मुरूगानथ एम. यांनी रेती तस्करांवर कारवाई करण्याचा धडाका लावल्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले होते. अनेक जड वाहनांवर त्यांच्या मार्गदर्शनात कारवाया करण्यात आल्यामुळे चंद्रपुर तहसिल कार्यालयात रेतीच्या कारवायात जप्ती केलेल्या वाहनांना ठेवायला तहसिल कार्यालयात जागा अपुरी पडत असल्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे वाहने ठेवण्यात आली. काही वाहने प्रशासकीय भवन समोर तर काही वाहने रामनगर पो.स्टे. समोर आढळून येत आहे. या जप्ती केलेल्या वाहनांवर अहवाल पाठवुन अन्य विभागांमार्फत कारवाई होणे अपेक्षित होते, तसे करण्यात आले नाही यात काय गोम दडलेली आहे, त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments