चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विजय सिद्धावार तर नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे !
चंद्रपूर (प्रति . )
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळात ही संघटना पत्रकारांच्या विविध समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांना एकसंघ करीत असुन विदर्भामध्ये या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक यांची निवड करण्यात आली असुन या संघटनेचा विस्तार विविध विंग च्या माध्यमातुन जोमाने करीत आहे. नुकतीच व्हॉईल ऑफ मिडीयाच्या डिजीटल विंग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे तर चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विजय सिद्धावार यांची नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. आज रविवार दि. २ एप्रिल रोजी आनंदवन वरोरा येथे व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सदस्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विजय सिद्धावार !
विजय सिद्धावार हे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार असून, मागील ३० वर्षापासून पत्रकारीतेत आहेत. महविदर्भ, महासागर, नागपूर पत्रिका, लोकसत्ता या वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केले असून त्यांचे विविध विषयावर राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात लेख ही प्रकाशित झाले आहेत. विजय सिद्धावार हे साप्ताहिक पब्लिक पंचनामा आणि पब्लिक पंचनामा या पोर्टलचे मुख्य संपादक आहेत. या क्षेत्रातील विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. विविध सामाजिक संघटनांशी ते जुडले असून, व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध शिबिर आणि प्रशिक्षण मेळावे आयोजित करून जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षित करू, असा विश्वास त्यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला आहे. विजय सिद्धावार यांची निवड झाल्याबद्दल, व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस के. अभिजीत, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांचे त्यांनी आभार मानले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून या संघटनेची जुळून कार्य करण्याकरिता ९४२२९१० १६७ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे !
देवनाथ गंडाटे २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत दीर्घकाळ १४ वर्ष पत्रकारिता केली. तसेच अलिबाग येथील कृषीवल, नागपुरातील लोकशाही वार्तीत वरिष्ठ उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे त्यांचे 'डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पत्रकारितेसोबत वेबडिझाइन, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग या विषयाचा अभ्यास आहे. व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात कार्यरत डिजिटल मीडिया पत्रकारांचे संघटन मजबूत करून त्यांना नव्या तंत्रज्ञानांची ओळख करून देण्याचा मानस त्यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाची कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असून, संघटनेत सदस्य होण्यासाठी ७२६४९८२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या