माता महाकाली यात्रेत नियोजनाअभावी भाविकांची गैरसोय ! Inconvenience of devotees due to lack of planning in Mata Mahakali Yatra!


चंद्रपूर (वि. प्रति. ) ; चंद्रपूर ची आराध्य दैवत माता महाकाली देवी ची यात्रा प्रारंभ झाली आहे. या यात्रेमध्ये मराठवाडा, तेलंगाणा सह अनेक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला आपली उपस्थिती दर्शवितात. दरवर्षी एका विशीष्ट तिथीला हे भाविक भक्तीभावाने शहरात येतात. पाणी, पाऊस याची पर्वा न करता थांबतात व माता महाकाली ची विधीनुसार पुजा - अर्चना करून दर्शन घेऊन आपआपल्या गावी परततात. मोठ्या प्रमाणात भक्तीभावाने देणग्या ही देतात. नियोजनाअभावी महाकाली यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असते. दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रेत भाविक मोठ्या संख्येत आले आहे. त्यांचेसाठी पिण्याची पाणी, आंघोळीची सोय करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट दिसत आहे. अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळी करणे हे या भाविकांच्या नशिबीचं पुजले आहे. प्रशासनातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याची पाणी, आंघोळीची व्यवस्था करण्यात आल्याचा देखावा केला जातो. परंतु ही व्यवस्था अत्यंत तोडगी असल्यामुळे यावर्षी माता महाकाली मंदिराच्या शेजारच्या परिसरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, मिळेल तिथे रहाण्याची व्यवस्था, मिळेल तिथे आंघोळ - शौचास जाणे, आणि दैनंदिन कार्ये ते पार पाडत आहे. प्रशासनाने या समस्येकंडे गांभीर्याने घेतले नाही.

वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी केलेली मारहाण निंदनीय ! The beating of journalists who went to collect news by the police is reprehensible!



बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ रोजी पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे प्रशिक्षार्थी पत्रकार नेमन धनकर आणि सुनिल देवांगण हे यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना आंघोळीची पुरेसी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे उघड्यावर व अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करीत असतांना व्हिडीओ शुटींग करीत असतांना सब इन्स्पेक्टर मिलिंद गेडाम यांनी त्यांची कोणतीही विचारणा न करता त्यांना मारहाण केली व महाकाली मंदिर परिसरात पोलिस विभागाने स्थापित केलेल्या चौकीमध्ये या दोन ही पत्रकारांना घेऊन जाऊन त्याठिकाणी त्यांचेपाशी ओळखपत्र असुन सुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली, याची माहिती पार्थशर समाचार चे मुख्य संपादक राजेश नायडु यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष या चौकीला भेट देवून सदर पत्रकार हे पार्थशर समाचार साठी वृत्त संकलन करीत होते व त्यामुळे त्यांनी व्हिडीओ शुट करणे भाग असल्यामुळे ते व्हिडीओ शुट करीत असल्याचे प्रत्यक्ष सांगीतल्यानंतर सुद्धा गेडाम यांनी पत्रकाराजवळील मोबाईल हिसकावून घेऊन व्हिडीओ डिलीट केले , पोलिसांची पत्रकारांशी केलेली वागणुक ही निंदनीय आहे. पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देणारे पोलिस अधिकारी मिलिंद गेडाम  यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे. 

माता महाकाली भक्तानां होणारी गैर सोय टाळावी - एड. सुनीता पाटील Devotees of Mata Mahakali should avoid inconvenience - Ed. Sunita Patil


चंद्रपुर ची आराध्य दैवत माता महाकाली येथे अनेक वर्षा पासून यात्रा भरत आली आहे. विविध ठिकानावरुन भाविक भक्त दर्शना करिता येतात. नांदेड़, परभणी, कंधार, पूर्णा, माहुर,  अकलूज आदि. मराठवाड़ा तील विविध जिल्हा व गाव स्तरावरुन भक्त येतात तसेच विदर्भातुन सुद्धा अनेक भक्त येतात . सर्व भक्त माता महाकाली च्या श्रध्ये पोटी झरपट नदी (नाला) येथे अंघोळ करतात . किती ही घाण असलेली ही नदी भक्तांना सूतक सोडवन्या साठी छान च वाटत कारण पर्याय नाही. होय, माता महाकाली देवस्थान संस्थान मार्फ़त येणाऱ्या भक्तांच्या अंदाजी सुद्धा अंघोळ ची व्यवस्था केले नाही आहे करिता भक्तानां अपू-या जानकारी मुळे मल मूत्र वाहणाऱ्या नदी नाल्यात अंघोळ करतात व दर्शना करिता जातात. रैयतवारी , महाकाली कॉलरी कड़े असलेल्या स्मशानभूमि जवळील नाल्यात भक्तांची झुबंळ दिसत आहे , भक्तानां माहिती नाही व माहिती जरी असली तरी पर्याय नाही करिता अश्या घाण पाण्यात स्नान करतात, जवळच मल मूत्र करतात. हीच योग्य ती सोय माता महाकाली देवस्थान संस्थान ने देण्यात यावी व या कड़े जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिका ने लक्ष द्यावे ही विनंती आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे व भाविक भक्तानां कडून ही मागणी करण्यात येत आहे. चंद्रपुर मधील स्थानिक भक्तांची तक्रार वर आप महानगर चे महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटिल यांनी महाकाली कॉलरी रैयतवारी कड़े असलेली स्मशान भूमि कड़े नाल्यात आंघोळ करीत असलेल्या भक्तांच्या भावना जानून घेत या कड़े उद्या जिल्हा प्रशासन व महानगर पालिका यांना निवदेन मार्फ़त योग्य ती सोय करावी व स्वच्छते कड़े भर द्यावी ही मागणी करण्यात येणार आहे.  या स्थानी भेट देताना उपस्थित राणी जैन, जास्मिन शेख, रूपा काटकर, शबनम शेख, मीना पोटफोडे, सिकंदर सागोरे, राजेश चेडगुलवार आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments