वाघाच्या शिकार प्रकरणी ताडोबाचे अधिकारी चौकशीसाठी आसाम ला रवाना !#Tadoba officials left for Assam for investigation in case of tiger poaching!


पकडलेल्या शिकाऱ्यांचे लोकेशन जुळ्या जिल्ह्यातील !
जिल्ह्यात शिकाऱ्यांचे जाळे बळावल्याच्या संशय !

चंद्रपूर (वि. प्रति . ) : २८ जुन २०२३ रोजी आसाम पोलिसांनी हरियाणातुन बावरिया जमीच्या चार जणांना अटक केली आणि गुवाहाटीमध्ये वाघाची कातडी आणि १९ किलो हाडे जप्त केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखील एका व्यक्तीला अटक केली आहे.

या प्रकरणी शिकाऱ्यांचे मोबाईल लोकेशन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दिसून आले असल्यामुळे या प्रकणाच्या चौकशीसाठी उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे आणि आणखी दोन अधिकाऱ्यांची चमु आसामला चौकशीसाठी गेली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त वाघांचे अस्तित्व असलेल्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात वाघांची शिकार करणाऱ्यांचे व आंतरराष्ट्रीय तस्करांचे नेटवर्क फोफावले असल्याचे मत वन्यजीव प्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. 

After that the officials of the forest department arrested another person involved in this case and as the mobile location of the hunters was found in Chandrapur and Gadchiroli district in this case, Deputy Director (Core) Nandkishore Kale and two other officials have gone to Assam for investigation. Therefore, in the Chandrapur-Gadchiroli district, which has the largest number of tigers, the network of tiger poachers and international smugglers has flourished among wildlife lovers.


चंद्रपूर येथून केली होती आंतराष्ट्रीय तस्कर संचारचंद च्या साथीदारांना अटक !

सविस्तर वृत्त असे की, २८ जुन रोजी आसाम पोलिसांनी हरियाणा येथून बावरिया जमातीच्या चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून गुवाहाटीमध्ये एका पट्टेदार वाघाची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून ९ फुट लांबीची कातडी आणि अंदाजे १९ किलो हाडे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे गोपनियतेमुळे जाहिर करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिकार झालेला हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील असण्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या बघता शिकारी सक्रिय झाले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन सतर्क झाले आहे. आरोपींचा छडा लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील चौकशीसाठी ताडोबाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांचेसमवेत इतर काही अधिकाऱ्यांचे पथक आसाम ला रवाना झाले आहेत. आरोपींच्या मोबाईल लोकेशन चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील दाखवित असल्यामुळे शिकार झालेला वाघ या जुळ्या जिल्ह्यातील तर नाही ना ? अशी शंका व्यक्त करण्यात येत असुन आसाम ला गेलेले पथक परत आल्यानंतर शिकार प्रकरणाची सत्य बाहेर येईल. यापुर्वी छत्तीसगड वनविभागाच्या इंद्रावती टायगर रिजर्व्ह पथकाने शिकार झालेल्या वाघांच्या कातडी प्रकरणांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील एकाला अटक केली होती. या घटनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांचे जाळे पसरले आहे कां याची चौकशी करून त्यावर लगाम कसण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र वनविभागासमोर आता उभी ठाकली आहे. Earlier, the Indravati Tiger Reserve team of Chhattisgarh Forest Department had arrested one from Gondpipari taluka of Chandrapur district in cases of poached tiger skins. Due to these incidents, the Maharashtra Forest Department has now faced a big responsibility to investigate whether the network of wildlife poachers has spread in Chandrapur district and rein it in.


हे सुद्धा वाचा : 👉👉

बदली झाली पण बफर व कोअर क्षेत्रामध्ये जाण्यास कर्मचाऱ्यांचा 'नकार' !

Post a Comment

0 Comments