बदली झाली पण बफर व कोअर क्षेत्रामध्ये जाण्यास कर्मचाऱ्यांचा 'नकार' ! The transfer took place but the employees 'refused' to go to the buffer and core area!


चंद्रपूर वनवृत्तातील बदलीतील अनियमतिता चव्हाट्यावर !

चंद्रपूर (वि. प्रति . ) : मध्य चांदा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, ताडोबा-अंधारी प्रकल्पातील कोअर, बफर क्षेत्रात रूजू झाल्यापासुन एकाच विभागात काहीजण कार्यरत आहेत. बदली झाल्यानंतर ही बफर व कोअर क्षेत्रामध्ये जाण्यास काहींनी नकार देत सोयीनुसार वरिष्ठांशी जमवुन घेत आपल्या बदलीच्या ठिकाणातुन बदल करवून घेतला असुन काही अद्याप ही रुजू झालेले नसुन 'सेटिंग' करून काही होवू शकते काय या तयारीत असल्यमुळे वनविभागातील चंद्रपूर वनवृत्तातील बदलीतील अनियमितता आता चव्हाट्यावर आली आहे. रिक्त जागा न भरल्यास वाघ व वन्यजीव संरक्षणाची मोठी समस्या भविष्यात उभी राहु शकते, असे आता या क्षेत्रात अनेक वर्षापासुन कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कुजबुज सुरू झाली आहे. वन अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळून कर्मचारी वर्षानुवर्षेएकाच ठिकाणी कसे काम करीत आहे अशांना बदली च्या ठिकाणी पाठविण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वाघाची शिकार करणाऱ्या कुख्यात टोळीला पकडण्यात वनविभागाचे संयुक्त पथक यशस्वी !

"

विदर्भ आठवडी" ने जुळ्या जिल्ह्यातील तस्करांचे जाळे यावर टाकला होता प्रकाश!

 

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर वनवृत्तातील बदल्याची ज्येष्ठता तयार करण्यात आली. त्यात बढती कर्मचारी व तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले तसेच एकाच विभागात सहा वर्षेपूर्ण सेवा केलेल्या २७ बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूर वनविभाग, मध्य चांदा विभाग, ब्रम्हपुरी विभाग, ताडोबा-अंधारी प्रकल्पातील बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांचे बदली आदेश मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित विभागाला १८, १२ व ३० जून २०२३ ला निर्गमित केले. आदेश विभागात धडकताच एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या व बदली झालेल्या वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी 'सुत' जमवित अंशतः या बदली आदेशात बदल करवून घेतला, त्यामुळे पुर्वीपासुन एकाच ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असुन आम्ही एकाच ठिकाणी किती वर्ष कार्यरत राहायचे ही चर्चा आता हळूहळू बाहेर येवू लागल्यामुळे वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचेच असल्यामुळे त्यांच्याच असल्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी स्वतः वनमंत्र्यांचे लक्ष वेधावे लागेल काय ? अशी प्रतिक्रिया काही जणांकडून आता व्यक्त होवु लागली आहे. बदली होवून ही बदलीच्या ठिकाणी न जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवा - शर्थीचा भंग केल्याप्रकरणी कां कारवाई करण्यात येवू नये असा सवाल यानिमीत्ताने उभा राहु लागला आहे.

चंद्रपूर वनविभागातील सर्वसाधारण वनपाल, वनरक्षक, सर्व्हेअर, मुख्य लेखापाल, लेखपाल, लिपिक, वाहन चालक संवर्गातील बदल्या करण्यात आल्या असुन मागील अनेक वर्षापासून अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू न होता सोयीच्या ठिकाणी रुजू झाल्याचे आढळून येत आहे. या बदली प्रक्रियेची चौकशी करून त्यांना बदली ठिकाणी रुजू करण्यास बाध्य करण्यात यावे न झाल्यास त्यांना सेवा शर्थीचा भंग केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्यात येत नाही, असा सवाल ही यामीत्ताने आता उभा राहत आहे.

Post a Comment

0 Comments