अन् असे झाले चंद्रपूर शहर "ब्लॅक गोल्ड सिटी !” ..And thus the city of Chandrapur became "Black Gold City!"



अभियंता दिनाच्या समस्त 
अभियंता बांधवांना शुभेच्छा !


आज अभियंता दिन ! स्थापत्य अभियंता असलेले भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या मोक्षगुंडम यांच्या आश्चर्यकारक अभियांत्रिकी कार्याच्या आठवणीमध्ये हा दिवस संपूर्ण भारतात अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. विज्ञानाने केलेली प्रगतीत वाट्यात अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्राने विश्वास बसणार अशी प्रगती केली आहे. काळ्या सोन्याची नगरी चंद्रपूर कोळश्यासाठी देशात ओळखल्या जाते. सर्वप्रथम याच कोळसा उद्योगाने चंद्रपूर ला आपली ओळख निर्माण करून दिली. आज कोळसा सर्वचं प्रगतीचे मुळ बनले आहे. नितांत गरज असलेल्या विजेची निर्मीती मोठ्या प्रमाणात कोळश्यापासुन होते. जमिनीमधून कोळसा काढण्यापासून तर त्याचे विजेमध्ये रूपांतर करेस्तोवर अभियंत्यांचे योगदान पावलोपावली असते. आज सर्वच क्षेत्र अभियंत्याशिवाय अपुरे आहे. ननाविण्यपुर्ण आभाळाला गवसणी घालणाऱ्या इमारती पाहिल्या की स्थापत्य अभियंत्यांची प्रशंसा अपसुकच होते. केबल मधून घरामध्ये पोहोचणारी विज इलेक्ट्रीक इंजिनिअर असे एक रोजच्या वापरातील कोणत्याही वस्तुंवर नजर गेली तर त्यात अभियंता हा दडलेलाचं असतो. त्या समस्त अभियंताबंधुना अभियंता दिनाच्या समस्त अभियंता बांधवांना शुभेच्छा !


अठराशे च्या शतकात कोळसा चंद्रपूरात मिळाला. त्याचाच थोडक्यात हा आढावा...!


🌹 *सा. बां. चे कार्य. अभियंता सुनील कुंभे यांना शासनाचा "उत्कृष्ट अभियंता" पुरस्कार जाहिर!


विदर्भातील चंद्रपूर शहराची ब्लॅक गोल्ड सिटी अशी ओळख आहे. या शहराचा भूगर्भीत भरमसाठ कोळशा आहे. या शहरात कोळसा असल्याची माहिती १८५४ साली लागली होती. इथं कोळसा असल्याचं सर्वप्रथम एका ख्रिस्ती धर्म प्रचारकाने सांगितलं होतं.
त्या धर्म प्रचारकाचे नाव स्टीफन हिस्लॉप असं आहे. येथील कोळश्याने चंद्रपूरला समृद्ध केलं. मात्र ज्याने इथं सर्वप्रथम कोळसा बघितला त्या हिस्लॉपचा विसर चंद्रपूरला पडला आहे.
स्टिफन हिस्लॉप यांचा जन्म ८ सप्टेंबर १८१७ रोजी स्कॉटलँड मध्ये झाला. एडिनबर्ग येथे त्याने शिक्षण घेतलं. बालपणासूनच कुशाग्र बुध्दिमत्तेचा असलेला हिस्लॉप २७ व्या वर्षी धार्मिक मार्गावर चालू लागला. फ्री चर्च ऑफ स्कॉटलँडमध्ये त्याची नियुक्ती मंत्री पदावर करण्यात आली. सन १८४४ मध्ये त्याला भारतात मिशनरी म्हणून पाठविण्यात आले. हिस्लॉपने मुंबईला काही काळ वास्तव्य केलं. त्यानंतर त्याने नागपूर गाठलं.
हिस्लॉप नागपुरात आला तेव्हा नागपुरात भोसले राजवंशाचे राज्य होतं. १८५४ मध्ये हिस्लॉप याने विभाजन पूर्व चंद्रपूर प्रदेशात भ्रमंती केली. या प्रदेशात फिरत असताना त्याला इथे कोळसा आढळून आला. तोपर्यत इथे कोळसा असल्याच कुणाला माहिती नव्हती.
मे १८५७ मध्ये मद्रास नेटिव्ह इन्फंट्रीचे कॅप्टन लॉरेन्स जॉन्स्टन हे नागपूरला आले होते. चांदा येथील वर्धा खोऱ्यात कोळसा असल्याचे कॅप्टन लॉरेन्स जॉन्स्टन यांनी हिस्लॉप यांना सांगितलं . तेव्हा तीन वर्षापुर्वीच मला तिथे कोळसा सापडला होता. त्याचे नमुने मी सरकार ला पाठविले होते, अशी माहिती लॉरेन्स जॉन्स्टनला हिस्लॉप यांनी दिली.त्यानंतर वैज्ञानिकांनी चद्रपूरात संशोधन केलं पुढं चंद्रपूरमध्ये कोळसा खाणींचा उदय झाला.
असा उभारला चंद्रपूरात कोळसा उद्योग !
मुंबई- नागपूर रेल्वेमार्ग १८६७ रोजी सुरू झाल्यानंतर तत्कालीन सी. पी. अॅण्ड बेरार प्रांतातील कृषी व उद्योगाचे अर्थकारण बदलले. १८७७ रोजी वर्धा ते वरोरा रेल्वे मार्ग पूर्ण झाला. चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील कोळसा खाणींतील ब्लॅक गोल्डवर नजर ठेवून ब्रिटीशांनी वर्धा-वरोरा-बल्लारपूरपर्यंत रेल्वे मार्ग सुरू केला. यातून स्वातंत्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील जिल्ह्याच्या उद्योगाचा पाया घातला.
(साभार)

Post a Comment

0 Comments