चंद्रपूर (का. प्र.)
चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने तांत्रिक संवर्गामध्ये "उत्कृष्ट भियंता" म्हणून शासनाने पुरस्कार घोषित केला आहे. १५ सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रामधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३० तांत्रिक व २१ अतांत्रिक अधिकाऱ्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र मधून तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
अत्यंत नम्र व मृदू सभावाचे, अभ्यासु प्रवृत्तीचे सुनिल कुंभे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ मध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती-पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करतांना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्यपणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी "अभियंता दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खालील तक्त्यातील अभियंत्यांचा सन २०२२-२३ या कालावधीकरीता वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 Comments