चंद्रपूर (का.प्र.): शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर अध्यक्ष श्री दीपक शंकरलाल जयस्वाल यांची तर चंद्रपूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर श्री.सुधाकर पांडुरंग कातकर यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री मा.श्री.अनिलबाबु देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. शहर अध्यक्षांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नव्या नियुक्ती करण्यासंदर्भात प्रांताध्यक्ष मा.आ.श्री.जयंत पाटील,पक्षाचे ज्येष्ठ नेते आ.अनिलबाबु देशमुख,चंद्रपूर शहराचे पक्ष निरीक्षक श्री.शेखर सावरबांधे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचेशी सविस्तर चर्चा करून वरील नावांची घोषणा केली.
गुरूवार (दि. ७) रोजी नागपुरात संपन्न झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाला चंद्रपूर शहराचे पक्ष निरीक्षक श्री.शेखर सावरबांधे,चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,महीला अध्यक्षा सौ.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष श्री.राकेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस श्री.मुनाज शेख, नागपूर शहर अध्यक्ष श्री.दुनेश्र्वर पेठे,नगरसेविका सौ.मंगला आखरे, माजी नगरसेवक विनोद लभाने, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, राजेंद्र काबरा, बादल उराडे, रवींद्र वाळके, सौ.शुभांगी साठे, सौ.अनिता मावलिकर, सौ.पूजा शेरकी, हरिनाथ यादव, बंडू नगराळे, दशरथ मिट्ठावार, पुष्पा निमगडे, उमा दुर्गे, पुष्पा काटरे, कुरुदुल्ला लिंगय्या, मारोती झाडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या